Mumbai Weather Forecast for Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!
भारतीय हवामाशास्त्र खात्याने आज मुंबईत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.मुंबई शहर आणि उपनगराच्या भागात मुसळधार पाऊस बरसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Mumbai Weather Prediction, August 05: भारतीय हवामाशास्त्र खात्याने आज मुंबईत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.मुंबई शहर आणि उपनगराच्या भागात मुसळधार पाऊस बरसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान मागील काही दिवसांपासून अधून मधून पडणार्या पावसाने आता काल पासून पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. कालही बरसलेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. व आता येणाऱ्या काही दिवसात पावसाचा जोर अजून वाढण्याची शक्यता आहे.हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे की, शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस पडेल आणि काही ठिकाणी जसे पालघरमध्ये आणि ठाण्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि नाशिकसह महाराष्ट्रातील इतर चार जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. आता मुंबईत उद्याचे हवामान कसे असतील यासाठी हवामान खात्याने मुंबईत उद्याचे हवामान याचा अंदाज लावला आहे.हेही वाचा: Mumbai Weather Forecast for Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!
आयएमडी अंदाजानुसार, पुढील 3-4 तास ठाणे, पालघर, नांदेड, हिंगोली, नाशिक, नंदूरबार, धुळे, जळगाव आणि सोलापूर मध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसण्याचा अंदाज आहे. यामध्ये वार्याचा वेग 30-40 kmph राहण्याचा अंदाज आहे. तसेच यावेळी वीजांचा कडकडाट आणि वादळी वार्याचा अंदाज आहे. मागील काही दिवस पावसाने थोडा ब्रेक घेतला होता पण आता राज्यात अनेक ठिकाणी त्याने पुन्हा जोरदार कोसळण्यास सुरूवात केली आहे.पालघर: काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस, काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस. पुणे आणि सातारा: घाट भागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस, मैदानी भागात मध्यम पाऊस.