Mumbai Weather Prediction,August04: भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठीआज ३ ऑगस्ट रोजी यलो अलर्ट जारी केला आहे. आज मुंबईत ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शहरात आणि उपनगरात मुसळधार पावसासह अधून मधून मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान ३१ अंश सेल्सियसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान २६ अंश सेल्सियसच्या आसपास राहणार आहे. शहरात यलो अलर्ट असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी 6 ऑगस्टपर्यंत मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशाराही जारी केला आहे. शनिवारी, आज सकाळी मुंबई शहराच्या काही भागात मुसळधार पाऊस पडला, ज्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचले. अनेक रस्त्यांवर पाणी साचले असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. येणाऱ्या काही दिवसात मुंबईत पावसाचा जोर वाढणार आहे असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.आता मुंबईत उद्याचे हवामान कसे असतील यासाठी हवामान खात्याने मुंबईत उद्याचे हवामान याचा अंदाज लावला आहे.हेही वाचा: Mumbai Weather Forecast Today: मुसळधार पावसाची शक्यता असल्याने मुंबईत आज यलो अलर्ट, IMD चा इशारा

मुंबईत उद्याचे हवामान कसे? 

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. आज पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तिथे अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबईसह मराठवाडा, संपूर्ण विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.आयएमडी मुंबईच्या अंदाजानुसार, पुढील 3-4 तास ठाणे, पालघर, नांदेड, हिंगोली, नाशिक, नंदूरबार, धुळे, जळगाव आणि सोलापूर मध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसण्याचा अंदाज आहे. यामध्ये वार्‍याचा वेग 30-40 kmph राहण्याचा अंदाज आहे. तसेच यावेळी वीजांचा कडकडाट आणि वादळी वार्‍याचा अंदाज आहे. मागील काही दिवस पावसाने थोडा ब्रेक घेतला होता पण आता राज्यात अनेक ठिकाणी त्याने पुन्हा जोरदार कोसळण्यास सुरूवात केली आहे.