Mumbai Weather forecast For Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!
मुंबईत आज 1 ऑगस्ट 2024 रोजी तापमान 27.79 डिग्री सेल्सियस आहे. दिवसाचा अंदाज किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 26.99 °C आणि 27.9 °C दर्शवतो.
Mumbai Weather Prediction,August02 : भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, आज 1 ऑगस्ट रोजी मुंबईत मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि साधारणपणे ढगाळ आकाश असेल. मुंबईत आज 1 ऑगस्ट 2024 रोजी तापमान 27.79 डिग्री सेल्सियस आहे. दिवसाचा अंदाज किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 26.99 °C आणि 27.9 °C दर्शवतो.ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. 3 ऑगस्ट पासून मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला. यामुळे अनेक धरण आणि तलाव क्षेत्रातील पाणीसाठ्यातही वाढ झाली. मुंबईत सुरुवातीला रिमझिम पावसाच्या सरी बरसल्या. त्यानंतर मात्र पावसाने जोर वाढला. काही दिवसानपूर्वी मुंबईत मुसळधार पाऊस झाला. यामुळे जनजीवनही विस्कळीत झाले होते. मात्र आता गेले दोन तीन दिवस पावसाचा वेग कमी झाल्याचे पाहायला मिळते आहे. पण ऑगस्ट महिन्यात पुन्हा पावसाचा जोर वाढेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.आता मुंबईत उद्याचे हवामान कसे असतील यासाठी हवामान खात्याने मुंबईत उद्याचे हवामान याचा अंदाज लावला आहे.हेही वाचा: High Tide Alert: मुंबई शहर- उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत 3-8 ऑगस्ट दरम्यान समुद्राला येणार उधाण; नागरिक, मच्छिमार, पर्यटकांनी सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेण्याचे आवाहन
मुंबईत उद्याचे हवामान कसे?
भारतीय हवामान विभाग (IMD) ने गुरुवारी (1 ऑगस्ट) दिल्ली (Delhi) आणि केरळमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rainfall) कोसळेल असा अंदाज वर्तवला आहे. त्यासोबतच राष्ट्रीय राजधानीत ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केला आहे. मुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्टवर असलेल्या इतर राज्यांमध्ये महाराष्ट्र (Maharashtra), हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि गोवा यांचा समावेश आहे. देशभरातील अनेक ठिकाणी अतिपर्जन्यवृष्टी झाल्याने पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी भूस्खलन झाले आहे. वायनाड येथील भूस्खलनात शेकडो लोकांचा बळी गेला आहे. त्यामुळे हवामान विभागाने नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.