Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! 'या' भागात 13 जूनला पाणीपुरवठा राहणार बंद

वाशी नाका येथे जल वाहिन्यांच्या कामामुळे मानखुर्द, गोवंडी ,चेंबूर परिसरातील काही भागांत पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आजच पाणी साठवून ठेवणे योग्य राहील.

Water Cut | Image Used For representational Purpose | Pixabay.com

Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. उद्या म्हणजेच गुरुवारी उपनगरातील काही विभागांत पाणीपुरवठा बंद(Water Cut) ठेवण्यात येणार आहे. वाशी नाका येथे जल वाहिन्यांच्या कामामुळे मानखुर्द, गोवंडी ,चेंबूर परिसरातील काही भागांत पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे पाणी पुरवठा ठप्प होणाऱ्या भागात नागरिकांनी आजच पाणी साठवून ठेवणे योग्य राहील. 'नागरिकांनी पाणी जपून वापरावे' असे आवाहन पालिकेच्या जल विभागाकडून करण्यात आले आहे.(हेही वाचा:Maratha OBC Reservation: ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी लक्ष्मण हाकेंकडून प्राणांतिक उपोषणाची घोषणा; आंतरवाली सराटीतच करणार उपोषण )

जल वाहिन्यांचे काम वाशीनाका येथे उद्या गुरुवार 13 जून रोजी करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या सकाळी 11 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत चेंबूर, गोवंडी ,देवनारी ,मानखुर्द परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मुंबई शहरातील काही विभाग हे पालिका यंत्रणेच्या एकदम शेवटच्या टोकाला आहेत. त्यामुळे त्या भागांना कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. नागरिकांना योग्य प्रमाणात पाणी पुरवठा व्हावा यासाठी पालिकेने जल वाहिन्या बसवण्याचे काम हाती घेतले आहे.

या विभागांत पाणीपुरवठा राहणार बंद

एम पूर्व विभाग

गुरुवारी सकाळी 11 ते रात्री 11 या काळात M पूर्व विभागातील बीट क्रमांक 147 ते 148 लक्ष्मी वसाहत, राणे चाळ, नित्यानंद बाग, तोलाराम वसाहत, श्रीराम नगर, जे. जे. वाडी, शेठ हाइट्स, डोंगडों रे पार्क, टाटा वसाहत, भारत पेट्रो लियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) वसाहत, हिंदुस्थान पेट्रो लियम कॉर्पोरेशन लिमिटेड वसाहत, गवाणपाडा, हिंदुस्थान पेट्रो लियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) रिफायनरी, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, टाटा पॉवर थर्मल प्लांट, भाभा अणु संशोधन केंद्र (BARC), वरुण बेवरेजेस या भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

एम पश्चिम विभाग

एम पश्चिम विभागातील माहुलगाव, आंबापाडा, जिजामाता नगर, वाशी नाका, मैसूर वसाहत, खाडी मशीन, रामकृष्ण चेंबूरकर (RC) मार्ग, शहाजी नगर, कलेक्टर वसाहत, सिंधी वसाहत, लालडोंगरडों, सुभाषचंद्र बोस नगर, नवजीवन सोसायटी, ओल्ड बराक, चेंबूर छावणी या भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.