Mumbai Water Cut: मुंबईत पुढील तीन दिवस पाणी कपात, 'या' भागात पाण्याची कमतरता
त्यामुळे मुंबईकरांनो पाणी जपून वापरा असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
Mumbai Water Cut: मुंबई शहरात पुढील तीन दिवस मुंबईत पाणी टंचाई भासणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनो पाणी जपून वापरा असा इशारा प्रशासनाने दिला आहे. मुंबईतील काही भागात सोमवारी पाणी कपात होणार आहे. मुंबई महापालिकेच्या ब्रिटिशकालीन मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीसाठई तज्ज्ञ मंडळी जलाशयाची अंतर्गत पाहणी करणार आहे. या जलाशयाचा कप्पा क्रमांक 1 पूर्णपणे रिकामी करण्यात येणार आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईतील महापालिकेच्या ए, सी, डी, जी दक्षिण विभाग कार्यालयांच्या हद्दीतील काही भागात सोमवारी 10 टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. (हेही वाचा- उद्यापासून मुंबईत 10 टक्के पाणी कपात, पाणी जपून वापरण्याचे आवाहन
ठाण्यातील काही भागात आज महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा करण्यात येते. बारवी जलशुध्दीकरण केंद्र जांभूळमध्ये तातडीचे दुरुस्तीचं काम करण्यात येत आहे. त्यामुळे शुक्रवारी दुपारी १२ पासून रात्री एकूण १२ तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा- मानपाडा आणि वागळे इस्टेट (काही भागात) प्रभागसमितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो.
मुंबईत आणि ठाण्यात पाणी कपात असल्याने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचा इशारा दिला आहे. ठाणे महानगरपालिके अंतर्गत दिवा मुंब्रातील प्रभाग २६ आणि ३१चा काही भाग वगळता आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागामध्ये त्यानंतर वागळे इस्टेट प्रभाग समितीमधील रुपादेवी पाडा, किसननगर नं २, नेहरूनगर, मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव इथल्या पाणीपुरवठा १२ तासासाठी पुर्णपणे बंद राहिल. पाणी पुरवठा सुरु झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल.