LGBTQI समाजासाठी मुंबई मध्ये भरला 'विविध' रोजगार मेळावा; Godrej, IBM सारख्या प्रसिद्ध 15 कंपन्यांचा समावेश

Godrej, Ernst and Young, Dr Reddy’s, IBM आणि Standard Chartered सारख्या कंपन्यांनी सहभाग घेतला होता. जेंडर न्युट्रल वॉशरूम्स ते वैद्यकीय सेवा अशा विविध सेवा या कंपन्यांकडून उमेवदारांसाठी खुल्या करण्यात आल्या.

LGBTQ | Representational Image | (Photo Credits: IANS Photo)

मुंबईतील वरळी येथील नेहरू सेंटरमध्ये LGBTQI समाजातील तरूण- तरूणींसाठी 'विविध' (Vividh) नावाची पहिली जॉब फेअर आयोजित केली होती. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, या रोजगार मेळाव्यात म्हणजेच जॉब फेअर मध्ये सुमारे 15 हून अधिक नामांकित संस्थांचा समावेश आहे. मीडिया फर्म्स ते कॉरपरेट कंपन्यांचा यामध्ये समावेश आहे. लेस्बियन (Lesbian), गे (Gay), ट्रान्सजेंडर (Transgender) यांच्याप्रमाणे अ‍ॅसिड हल्ल्यात बचावलेले ते अगदी दिव्यांगांसाठी या रोजगार मेळाव्यात विविध नोकरीच्या संधींबद्दल माहिती देण्यात आली. समलैंगिक जोडी पहिल्यांदाच मुंबईत लग्नबेडीत अडकली

'विविध' च्या पहिल्याच रोजगार मेळाव्याला उमेदवारांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. यामध्ये Godrej, Ernst and Young, Dr Reddy’s, IBM आणि Standard Chartered सारख्या कंपन्यांनी सहभाग घेतला होता. जेंडर न्युट्रल वॉशरूम्स ते वैद्यकीय सेवा अशा विविध सेवा या कंपन्यांकडून उमेवदारांसाठी खुल्या करण्यात आल्या. पाच भारतीय ट्रान्सजेंडर महिला ज्यांनी प्रवाहातील महिलांपेक्षाही केली दमदार कामगिरी

सर्वोच्च न्यायालयाकडून Section 377, समलिंगी संबंधांना गुन्हा ठरवणारं भारतीय कलम रद्द केले आहे. मात्र तरीही या समाजाकडे तुच्छतेने पाहिलं जातं. त्यांना नोकरी मिळवण्यासाठी पुरेशी संढी मिळत नाही. अनेकांना कामाच्या ठिकाणी दुय्यम स्थान दिलं जातं. त्यामुळे अर्थाजनासाठी अनेकांच्या वाटा खुंटतात. या समस्यांमधून उत्तर शोधण्यासाठी 6 Degrees या संस्थेने या रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं होतं. यामध्ये तात्काळ नोकरीसाठी मुलाखत, उमेदवारांच्या सीव्हीचं मुल्यमापन करून त्यांचं समुपदेशनही करण्यात आलं.