Mumbai University UG Admissions 2025: मुंबई विद्यापीठात डिग्री कोर्स साठी अर्ज करायला 10 जून पर्यंत मुदत; mu.ac.in ला द्या भेट

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, मुंबई विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांमधील पदवीपूर्व अभ्यासक्रमांसाठी प्रवेशपूर्व नोंदणीच्या वेळापत्रकानुसार विद्यापीठाने तीन गुणवत्ता यादी जाहीर केल्या आहेत, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

Mumbai University UG Admissions 2025: मुंबई विद्यापीठात डिग्री कोर्स साठी अर्ज करायला 10 जून पर्यंत मुदत;  mu.ac.in  ला द्या भेट
Mumbai University | (Photo Credits: mu.ac.in)

University of Mumbai कडून undergraduate courses साठी अर्ज करण्याची अंतिम मुदत आता वाढवण्यात आली आहे. जे विद्यार्थी 3 आणि 4 वर्षाच्या डिग्री कोर्स साठी अर्ज करु इच्छितात त्यांना आता 10 जून पर्यंत अर्ज करता येणार आहे. Mumbai University मध्ये UG Admission 2025 साठी mu.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर 10 जून दिवशी रात्री 10 वाजेपर्यंत अर्ज करण्याची मुभा आहे. मुंबई विद्यापीठाच्या वेळापत्रकानुसार, त्यांच्याकडून चौथी मेरीट लिस्ट 11 जून आणि पाचवी मेरीट लिस्ट 14 जून 2025 दिवशी जाहीर केली जाणार आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, मुंबई विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांमधील पदवीपूर्व अभ्यासक्रमांसाठी प्रवेशपूर्व नोंदणीच्या वेळापत्रकानुसार विद्यापीठाने तीन गुणवत्ता यादी जाहीर केल्या आहेत, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

Mumbai University Admissions 2025 चं नवं वेळापत्रक काय सांगतं?

Pre-admissions ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया - 6 ते 10 जून

चौथी मेरीट लिस्ट - 11 जून

ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि फी - 11 ते 13 जून ( संध्याकाळी 4 वाजेपर्यंत)

पाचवी मेरीट लिस्ट - 14 जून

ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि फी - 14 ते 18 जून ( संध्याकाळी 5 वाजेपर्यंत)

Mumbai University UG Admissions 2025 मध्ये अर्जाची प्रक्रिया

  • अधिकृत वेबसाईट mu.ac.in /muugadmission.samarth.edu.in ला भेट द्या.
  • होम पेज वर ‘UG Admission’ वर क्लिक करा.
  • “New Registration" बटण वर क्लिक करा.
  • तुमचं नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर, इमेल आयडी वापरून रजिस्ट्रेशन करा.
  • आता तुमचा इमेल आयडी वापरून लॉगिन करा.
  • आता अ‍ॅप्लिकेशन फॉर्म भरा. आवश्यक डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • तुमची फी भरा आणि अर्ज एकदा पुन्हा तपासून पहा.

(The above story first appeared on LatestLY on Jun 06, 2025 10:53 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).