शुल्लक वादातून तरुणाला रेल्वेबाहेर फेकले, आरोपींना अटक

उपनगरीय रेल्वेमध्ये शुल्लक वादातून तरुणाला रेल्वेबाहेर फेकल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली आहे.

फोटो सौजन्य - फाइल फोटो

उपनगरीय रेल्वेमध्ये शुल्लक वादातून तरुणाला रेल्वेबाहेर फेकल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली आहे. तसेच पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

विरार- चर्चगेट रेल्वेमध्ये सोमवारी गोरेगाव येथे इमरान खान आणि हसनी खान हे दोघे रेल्वेमध्ये चढले. रेल्वेत चढल्यावर या दोघांनी मोठ मोठ्याने एकमेकांसोबत बोलण्यास सुरुवात केली. त्याचवेळी त्यांच्या बाजूला उभ्या असलेल्या प्रतीक पवारने त्यांना हळू आवाजात बोलण्यास सांगितले. तरीही हे दोघे त्याच मोठ्या आवाजात बोलत होते. तेव्हा प्रतीकने पुन्हा एकदा जाऊन त्यांना हळू आवाजात बोला असे नम्रपणे सांगितले. त्यानंतर इमरान आणि हसनी यांनी प्रतीकशी या कारणावरुन वाद घालण्यास सुरुवात केली. परंतु वाद शांत झाल्यानंतर ही या दोघांनी प्रतीकला त्यांच्याशी वाद घालण्यास भाग पाडले. मात्र या वेळी इमरान आणि हसनी यांनी पाठीपुढे न पाहता प्रतीकला लोअर परेल स्टेशनजवळ चालत्या रेल्वेतून खाली फेकल्याचा प्रकार घडला आहे.

या प्रकरणी प्रतीक गंभीर अवस्थेत रेल्वेच्या रुळांवर कोसळून पडला होता. त्यावेळी रेल्वे पोलिसांनी सतर्कता दाखवत त्याला नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तसेच सोमवारी रात्री पोलिसांनी इमरान आणि हसनी यांना शोधून घेऊन त्याच रात्री दोघांना अटक करण्यात आली आहे.