Mumbai: बीकेसीमध्ये उच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या पायाभरणी समारंभासाठी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) मध्ये वाहतूक निर्बंध जारी
रामकृष्ण परमहंस मार्ग आणि जे एल शिर्सेकर मार्ग यांना जोडणाऱ्या न्यू इंग्लिश स्कूल रोडवर कार्यक्रमाशी संबंधित वाहने वगळता दोन्ही दिशांनी वाहतूक बंद राहणार आहे.
Mumbai: मुंबई वाहतूक पोलिसांनी वांद्रे (पूर्व) येथील गव्हर्नमेंट कॉलनी मैदानावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या पायाभरणी समारंभासाठी आज 23 सप्टेंबर रोजी दुपारी 2 ते रात्री 9 वाजेदरम्यान वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) मध्ये वाहतूक निर्बंध जारी केले आहेत. रामकृष्ण परमहंस मार्ग आणि जे एल शिर्सेकर मार्ग यांना जोडणाऱ्या न्यू इंग्लिश स्कूल रोडवर कार्यक्रमाशी संबंधित वाहने वगळता दोन्ही दिशांनी वाहतूक बंद राहणार आहे. मोटारचालकांना महात्मा गांधी विद्या मंदिर रोडने रीडायरेक्ट केले जाईल. हे देखील वाचा: Maharashtra Weather Updates: आभाळात मेघांची दाटी, पाऊस मुसळधार बरसण्याच्या तयारीत; जाणून घ्या आजचे, उद्याचे हवामान
"सोहळ्याला सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश तसेच व्हीव्हीआयपी उपस्थित राहणार असल्याने, वाहतूक पोलिसांनी सुरळीत वाहने चालवण्यासाठी पर्यायी मार्ग आणि नो-एंट्री झोनचे नियोजन केले आहे." असे डीसीपी (मध्य) समाधान पवार यांनी सांगितले. खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करून तुम्हाला अधिक माहिती जाणून घेता येईल:- https://mumbaipolice.gov.in/files/PressRelease/2692.pdf
दरम्यान, कार्यक्रमामुळे उच्च न्यायालयाच्या इमारतीच्या सोहळ्यासाठी मुंबईतील बीकेसीमध्ये आज 7 तासांची वाहतूक कोंडी होणार आहे. त्यामुळे तुम्ही पर्यायी मार्ग निवडून वाहतूक कोंडीत अडकण्यापासून स्वतःला वाचवू शकता.