IPL Auction 2025 Live

Mumbai Traffic Policemen Advisory: राज्यातील तापमान वाढीमुळे मुंबई  पोलिस सावध;  55  वर्षांवरील पोलिस अंमलदारांसाठी खास सूचना

माणूसकीच्या नात्याने 55 वर्षांवरील दमा, रक्तदाब, मधुमेह असलेल्या पोलिस कर्मचार्‍यांऐवजी तरूण कर्मचार्‍यांना उन्हात ड्युटी देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

प्रतिकात्मक प्रतिमा Mumbai Police (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रामध्ये वाढता उन्हाचा पारा पाहता मुंबई पोलिस (Mumbai Police) देखील सतर्क झाले आहे. वाहतूक पोलिसांनी तळपत्या उन्हात आपले कर्तव्य बजावताना त्यांना उष्माघाताचा त्रास होऊ नये यासाठी काही निर्णय घेण्यात आले आहेत. पोलिस सहआयुक्त प्रवीण पडवळ (Joint Commissioner of Police (traffic) Pravin Padwal) यांनी प्रतिबंधात्मक उपाय सुचवले आहेत सोबतच काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. यामध्ये माणूसकीच्या नात्याने 55 वर्षांवरील दमा, रक्तदाब, मधुमेह असलेल्या पोलिस कर्मचार्‍यांऐवजी तरूण कर्मचार्‍यांना उन्हात ड्युटी देण्याच्या सूचना दिल्या आहेत. या कर्मचार्‍यांना उन्हामध्ये  ड्युटी न देता त्यांना कार्यालयीन काम देण्यात यावे अशा सूचना आहेत.

पहा ट्वीट

सोबतच उन्हात ड्युटी करताना एका कर्मचार्‍याची नेमणूक न करता जोडीने नेमणूक करावी. आवश्यकता असल्यास वॉर्डन नेमावेत. दुपारच्या वेळेत अधिकारी आणि अंमलदार यांच्याकरता स्वच्छ आणि थंड पाण्याची व्यवस्था करावी. सर्व अधिकारी आणि अंमलदारांनी न चुकता दुपारच्या वेळेत काम करताना डोक्यावर टोपी घालावी. तसेच कर्मचाऱ्यांना जर छातीत दुखणे, चक्कर येणे किंवा इतर कोणत्याही आरोग्यविषयक समस्या जाणवत असल्यास त्यांना तात्काळ कुटुंब आरोग्य योजना कार्यान्वित असलेल्या जवळच्या रुग्णालयात दाखल करावे. Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात 24 एप्रिल पासून काही दिवसांत गडगडाटासह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता; पहा जिल्हानिहाय हवामान अंदाज .

महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी खारघर मध्ये महाराष्ट्र भूषण प्रदान सोहळ्यामध्ये 14 जणांचा  तळपत्या उन्हात उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे. आता या घटनेनंतर सार्‍याकडूनच सतर्कता पाळली जात आहे.