Mumbai Traffic Diversion on Nov 14: पीएम नरेंद्र मोदी यांच्या शिवाजी पार्क वरील प्रचारसभेच्या पार्श्वभूमीवर दादर भागात 14 नोव्हेंबरला वाहतूकीत बदल

मोदींच्या दौर्‍यामुळे सुमारे 14 मार्गांवर बदल करण्यात आले आहेत. महायुतीच्या सभेला येण्यासाठी ईस्टर्न आणि वेस्टर्न हायवे वर मोठ्या संख्येत गाड्यांची वर्दळ असणार आहे.

PM Narendra Modi (PC - ANI/Twitter)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये (Maharashtra Vidhan Sabha Election) आता मतदानाचा दिवस जवळ येत आहे. 20 नोव्हेंबरला मतदानासाठी आता प्रचार शिगेला पोहचला आहे. या धामधूमीमध्ये मुंबईत महायुतीच्या प्रचारासाठी 14 नोव्हेंबरला  नरेंद्र मोदी (Narendra Modi)  दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर (Shivaji Park Dadar) येणार आहे. दरम्यान मुंबई ट्राफिक पोलिसांनी पीएमच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर काही मार्गांवर वाहतूकीत बदल केले आहेत. 14 नोव्हेंबरला सकाळी 10 ते रात्री 12 वाजेपर्यंत हे वाहतूकीमधील बदल लागू असणार आहेत.

मोदींच्या दौर्‍यामुळे सुमारे 14 मार्गांवर बदल करण्यात आले आहेत. महायुतीच्या सभेला येण्यासाठी ईस्टर्न आणि वेस्टर्न हायवे वर मोठ्या संख्येत गाड्यांची वर्दळ असणार आहे. (हेही वाचा, BJP Manifesto for Maharashtra Assembly Elections 2024: विधानसभा निवणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध; जाणून घ्या महत्त्वाचे मुद्दे)

दादर मध्ये कुठे वाहतूकीत बदल?

  • S V S रोड: बाबा साहेब वरळीकर चौक (सेंचुरी जंक्शन) ते हरिओम जंक्शन.
  •  संपूर्ण केळुस्कर रोड दक्षिण आणि केळुस्कर रोड उत्तर, शिवाजी पार्क, दादर.
  •  संपूर्ण एमबी राऊत मार्ग, शिवाजी पार्क, दादर.
  • पांडुरंग नाईक मार्ग (रस्ता क्र. 5) शिवाजी पार्क, दादर
  •  दादासाहेब रेगे मार्ग, शिवाजी पार्क, दादर.
  •  लेफ्टनंट दिलीप गुप्ते मार्ग: शिवाजी पार्क गेट क्रमांक 4 ते शीतलदेवी रोड, शिवाजी पार्क, दादर.
  •  एलजे रोड: गडकरी जंक्शन, दादर ते शोभा हॉटेल, माहीम.
  •  एनसी केळकर रोड: हनुमान मंदिर जंक्शन ते गडकरी जंक्शन, शिवाजी पार्क, दादर.
  •  टीएच कटारिया रोड: गंगा विहार जंक्शन ते आसावरी जंक्शन, माहीम.
  •  डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड : माहेश्वरी सर्कल ते कोहिनूर जंक्शन, दादर (पूर्व)
  •  टिळक रोड: कोतवाल गार्डन सर्कल, दादर (पश्चिम) ते आरए किडवाई रोड, माटुंगा (पूर्व)
  •  खान अब्दुल गफ्फार खान रोड: सी लिंक रोड ते जेके कपूर चौक मार्गे बिंदू माधव ठाकरे चौक.
  •  थडाणी रोड : पोद्दार हॉस्पिटल जंक्शन ते बिंदू माधव ठाकरे चौक.
  •  डॉ. ॲनी बेझंट रोड : पोद्दार हॉस्पिटल जंक्शन ते डॉ. नारायण हर्डीकर जंक्शन

पर्यायी व्यवस्था

- एसव्हीएस रोडने उत्तरेकडे जाणारे लोक सिद्धिविनायक जंक्शन ते एसके बोले रोड-आगर बाजार-पोर्तुगीज चर्च-लेफ्ट टर्न-गोखले, एसके बोले रोड असा पर्यायी मार्ग घेऊ शकतात.

- एसव्हीएस रोडने दक्षिणेकडे जाणारे दांडेकर चौक डावीकडे पांडुरंग नाईक मार्गे, राजा बढे चौक-उजवे वळण-एलजे रोडने गोखले रोड किंवा एनसी केळकर रोडने जाऊ शकतात.

महाराष्ट्रामध्ये 20 नोव्हेंबरला मतदान आहे तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी आहे. आता राज्यात विधानसभा निवडणूकीसाठी प्रचार  18 नोव्हेंबरला थंडावणार आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now