मुंबई: मध्य रेल्वे मार्गावर वाहतूक विस्कळीत; इंटरसिटी एक्सप्रेस तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांचा खोळंबा

मात्र, तोपर्यंत लोकल सेवेवर त्याचा पूर्ण परिणाम झाला होता. परिणामी जलद मार्गावरुन धावणाऱ्या गाड्या धिम्या मार्गावर वळविण्यात आल्या. त्यामुळे सध्यास्थिती मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनीटे उशिरा सुरु असल्याची माहिती प्रवाशांनी दिली आहे.

Central Railway Mumbai | (Photo Credits: Archived, Edited, Representative image)

ऐन गर्दीच्या वेळी आजही (मंगळवार, 10 ऑगस्ट 2019) मुंबई मध्य रेल्वे (Central Railway Mumbai) वाहतूक पुन्हा एकदा विस्कळित झाल्याचे पाहायला मिळत आहे. इंटरसिटी एक्सप्रेस (Intercity Express ) ही गाडी कोपर स्थानकाजवळ तांत्रिक बिघाडामुळे उभी राहिली. त्यामुळे पाठिमागून येणाऱ्या सर्वच गाड्यांवर त्याचा परिणाम होऊन मध्य रेल्वेची गती मंदावली. वाहतूक विस्कळीत झाल्याने मध्य रेल्वे मार्गांवरील स्थानकांच्या फलाटांवर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे.

दरम्यान, इंटरसिटी एक्सप्रेसमध्ये झालेला बिघाड दूर करत वाहतूक पूर्ववत करण्याच प्रयत्न मध्य रेल्वे प्रशासनाने केला. मात्र, तोपर्यंत लोकल सेवेवर त्याचा पूर्ण परिणाम झाला होता. परिणामी जलद मार्गावरुन धावणाऱ्या गाड्या धिम्या मार्गावर वळविण्यात आल्या. त्यामुळे सध्यास्थिती मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनीटे उशिरा सुरु असल्याची माहिती प्रवाशांनी दिली आहे.

मुंबई शहर आणि उपनगरात सकाळी साडेसहा ते दुपारी बारा हा कालावधी मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे अशा तिन्ही मार्गांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि गर्दीचा असतो. या वेळेत मुंबईतील कोणत्याही स्टेशनच्या कोणत्याही फलाटावर गेले तरी गर्दीचा महापूर पाहायला मिळतो. (हेही वाचा, मुंबई: हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत, मध्य रेल्वे वाहतुकीवरही परिणाम; मुंबईकर संतप्त)

सकाळच्या वेळी मुंबई आणि उपनगरांतून अत्यंत दूरदूरवरुन लोक शहरात नोकरी आणि व्यवसायासाठी येत असल्याने त्यांना भल्या पहाटेच प्रवास सुरु करावा लागतो. त्यामुळे ही गर्दी स्टेशनवर उसळलेली पहायला मिळते. अशा वेळी जर वाहतूक विस्कळीत झाली तर त्याचा प्रचंड त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो.