मुंबई: बेस्टच्या या तीन मार्गांवर रेल्वे स्टेशन ते ऑफिस होणार 'नॉनस्टॉप प्रवास', एकही थांबा न घेता मुंबईच्या 3 मोक्याच्या ठिकाणांचा समावेश

यात तीन बेस्ट मार्गांपैकी अंधेरी स्टेशन ते सेव्हन बंगलोज (Andheri Station to Seven Bunglows), कांदिवली स्टेशन ते ओटिस (Kandivali Station to Otis) आणि आगरकर चौक ते सीप्झ (Agarkar Chowk to Seepz) यांचा समावेश आहे.

BEST Bus (Photo credits: PTI)

मुंबईतील गर्दी, ट्रॅफिक, रेल्वेची समस्या असे अनेक टप्पे पार करत मुंबईकर आपल्या ऑफिसला पोहचत असतो. यात रेल्वे नंतर बसने प्रवास करणा-या नोकरदार वर्गाची संख्या जास्त आहे. बस साठी भली मोठी रांग पार केल्यानंतर त्या बसच्या थांब्यामुळे आणि ट्रॅफिकमुळे ऑफिसला पोहोचायला उशिर होतो. त्यामुळे अशा त्रस्त झालेल्या नोकरदार वर्गासाठी बेस्ट प्रशासन रेल्वे स्टेशन ते ऑफिस अशी नॉनस्टॉप बससेवा सुरु करण्याची योजना आखत आहे. टाईम्स ऑफ इंडिया ने दिलेल्या माहितीनुसार, यात मुंबईतील 3 महत्त्वाच्या आणि मोक्याच्या ठिकाणी ही सेवा सुरु करण्याचा बेस्टचा विचार आहे.

यात तीन बेस्ट मार्गांपैकी अंधेरी स्टेशन ते सेव्हन बंगलोज (Andheri Station to Seven Bunglows), कांदिवली स्टेशन ते ओटिस (Kandivali Station to Otis) आणि आगरकर चौक ते सीप्झ (Agarkar Chowk to Seepz) यांचा समावेश आहे. या मार्गांवर जाणा-या नोकरदार वर्गाची संख्या जास्त आहे. मात्र रस्त्यावरील ट्रॅफिकमुळे मुंबईकरांना ऑफिसला पोहोचेपर्यंत खूप वेळ जातो. म्हणून त्यांचा हा त्रास कमी व्हावा म्हणून रेल्वे स्टेशन ते ऑफिस हा प्रवास जलद गतीने पार करता यावा म्हणून ही योजना आम्ही आखत असल्याचे बेस्टच्या अधिका-यांनी म्हटले आहे. हेही वाचा-

मुंबई: गर्दीच्या निवडक ठिकाणी वाहनबंदी, 'बेस्ट' बस देणार मोफत सेवा; वाहतूक कोंडी टाळण्यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न

यामुळे जे लोक लोकल रेल्वे, मेट्रो असा प्रवास करुन आपला ऑफिस पर्यंतचा प्रवासाची वेळ वाचवतात आणि मग तेथून ऑफिसला बसने जाताना येणा-या अनेक थांब्यांमुळे त्यांचा वेळ वाया जातो अशांसाठी ही नॉनस्टॉप बससेवा खूप फायद्याची ठरेल. तसेच ही सेवा नॉनस्टॉप असल्या कारणाने प्रवाशांचा त्रासही वाचेल आणि वेळही वाचेल, असे बेस्ट प्रशासनाचे म्हणणे आहे.

हेही वाचा- मुंबईकरांसाठी आजपासून इलेक्ट्रिक बस सेवा सुरु, 'या' मार्गावर धावणार

तसेच एकही थांबा न घेता या बस प्रवासात कंडक्टरची आवश्यकता लागणार नाही. सुरुवातीच्या बस स्थानकातच प्रवाशांना तिकिट काढता येईल. तर पासधारकांसाठी ही सेवा खूपच फायदेशीर ठरेल. जर ही योजनेला मंजूरी मिळाली तर सीएसएमटी ते नरीमन पॉईंट आणि चर्चगेट स्टेशन ते वर्ल्ड ट्रेड सेंटर हा बससेवा सुरु करण्याचा विचार करण्यात येईल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif