Mumbai Threat: मुंबई उडवण्याची धमकी देणारा मोबाईल क्रमांक पाकिस्तानचा, संभाषण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क
मुंबईला धमकीचा मेसेज आलेला हा मोबाईल क्रमांक पाकिस्तानचा असल्याची खात्री पटली आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वीचं मुंबई (Muabai) पोलिस ट्राफिक कंट्रोल (Traffic Police Control Room) रुमला धमकीचे मेसेज आले होता. 26/11 सारखा भयानक हल्ला पुन्हा एकदा करणार असल्याची धमकी मुंबई पोलिसांना (Mumbai Police) देण्यात आली होती. कंट्रोल रुमच्या (Control Room) नंबरवर पाकिस्तानमधून (Pakistan) हे धमकी वजा मेसेजेस आले असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. तरी आता या शंकेचं रुपांतर खात्रीत झालं आहे. कारण मेसेज (Message) आलेला हा मोबाईल क्रमांक (Mobile Number) पाकिस्तानचा असल्याची खात्री पटली आहे. धमकीचा मेसेज आलेल्या त्या क्रमांकावर भारतातील एका पत्रकाराने फोन लावून बघितला असता तो फोन एक इसमाने उचलला असुन त्याला हा नंबर पाकिस्तानचा आहे असं त्याने सांगितलं. एवढचं नाही तर या पत्रकाराने (Journalist) त्या इसमाशी संवाद देखील साधला आहे.
फोन उचलणाऱ्या इसम लाहोर (Lahore) पाकिस्तानचा (Pakistan) रहिवासी असल्याचं सांगितलं. हा व्यक्ती पंजाबमध्ये (Panjab) एमडी हाऊसमध्ये (DM House) माळी म्हणून काम करतो. मला मेसेजही (Message) करता येत नाही, त्यामुळे या मेसेजबद्दल काहीही माहिती नाही आणि त्याला मेसेज पाठवता येत नाही. तसेच त्याने त्याचा फोन कोणाच्या हातात दिला नाही, अशी बतावनी केली. पण माझा नंबर (Contact Number) कोणी दुसरं वापरत असावं,अशी शक्यता या व्यक्तीने व्यक्त केली आहे कारण याआधीही त्याला असे फोन (Phone) आले, अशी माहिती संबंधित व्यक्तीकडून देण्यात आली आहे.(हे ही वाचा:- Devendra Fadnavis On Vinayak Mete Accident: चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक केल्याने विनायक मेटेंचा अपघात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान सभेत निवेदन)
फोन करणाऱ्या या व्यक्तीचं नाव मोहम्मद इम्तियाज (Muhammad Imtiaz) आहे. तो पकिस्तान सरकार (Pakistan Government) मध्ये नोकरीवर (Job) असून तो त्याच्या नंबरवर व्हॉट्सअप (Whats App) वापरत नाही. अशात त्याच्या नंबरवर कोणी दुसरं व्हॉट्सअपवर वापर असल्याची त्याला शंका आहे. तरी या सगळ्याची प्रकाराची भारतात सखोल चौकशी सुरु असून पुढे काय होणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.