मुंबई उपनगर जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघ: दिंडोशी ते अंधेरी पूर्व चे उमेदवार, महत्त्वाच्या लढती आणि निकाल घ्या जाणून

यंदा विधानसभा निवडणूकीमध्ये जोगेश्वरी पूर्व(Jogeshwari East),दिंडोशी (Dindoshi),गोरेगाव (Goregaon) , अंधेरी पश्चिम (Andheri West), अंधेरी पूर्व (Andheri East) या विधानसभा मतदारसंघांमध्ये पाहुया कोणत्या राजकीय पक्षांमध्ये, उमेदवारांमध्ये रंगणार चुरशीची लढत?

Maharashtra Vidhan Sabha Elections| File Image

Maharashtra Assembly Elections:  महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 च्या रणधुमाळीमध्ये यंदा सार्‍याच राजकीय पक्षांनी आपली राजकीय ताकद पणाला लावली. 21 ऑक्टोबर दिवशी विधानसभा निवडणूक मतदान 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये एकाच टप्प्यात पार पडणार आहे. मुंबईमध्येही विधानसभा मतदारसंघांमध्ये बाजी मारण्यासाठी राजकीय पक्ष कडवी टक्कर देणार आहेत. यंदा विधानसभा निवडणूकीमध्ये जोगेश्वरी पूर्व(Jogeshwari East),दिंडोशी (Dindoshi),गोरेगाव (Goregaon) , अंधेरी पश्चिम (Andheri West), अंधेरी पूर्व (Andheri East) या विधानसभा मतदारसंघांमध्ये पाहुया कोणत्या राजकीय पक्षांमध्ये, उमेदवारांमध्ये रंगणार चुरशीची लढत? इथे पहा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ चा सारे अपडेट्स.

जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदार संघ

मुंबई उपनगरामधील जोगेश्वरी पूर्व हा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वर्चस्वाखाली असणार्‍यांपैकी एक आहे. रविंद्र वायकर यांचा हा विधानसभा मतदार संघ आहे. सध्या रविंद्र वायकर यांच्या विरोधात कॉंग्रेसच्या सुनिल बिसन कुमरे यांचं आव्हान आहे.

दिंडोशी विधानसभा मतदार संघ

उत्तर भारतीय, मराठी आणि आदिवासी मतदार यांनी दिंडोशी विधानसभा मतदारसंघ बनला आहे. मुंबई उपनगरातील सर्वात मोठ आयटी पार्क देखील दिंडोशीमध्ये आहे. शिवसेनेचे सुनील प्रभू दिंडोशी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. यंदा निवडणूकीमध्ये सुनील प्रभू यांच्याविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विद्या चव्हाण निवडणूकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.

गोरेगाव विधानसभा मतदार संघ

शिवसेना आणि भाजपाच्या वर्चस्वाखाली असलेल्या गोरेगाव विधानसभा मतदार संघाच्या विद्यमान आमदार भाजपाच्या विद्या ठाकूर आहेत. हा प्रामुख्याने मराठी भाषिकांचा विधानसभा मतदारसंघ आहे. 2019 च्या विधानसभा निवडणूकीमध्ये भाजपा पक्षाने पुन्हा विद्या ठाकूर यांना तिकीट जाहीर केलं आहे. तर त्यांच्या विरोधात कॉंग्रेसचे युवराज मोहिते आणि मनसेचे विरेंद्र जाधव निवडणूकीच्या रिंगणात आहेत.

अंधेरी पश्चिम विधानसभा मतदार संघ

मध्यमवर्ग आणि उच्च मध्यमवर्गीय मतदार असा संमिश्र मतदार अंधेरी विधानसभा मतदारसंघामध्ये पहायला मिळतो. भाजपाचे अमित साटम या मतदार संघातील विद्यमान आमदार आहेत. यंदा विधानसभा निवडणूकीमध्ये अमित साटम यांच्या विरोधात कॉंग्रेसचे अशोक जाधव आणि मनसेचे किशोर राणे निवडणूकीच्या रिंगणात आहेत.

अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघ

उत्तर भारतीय आणि कोकणातील चाकरमनी यांनी मिळून संमिश्र असा अंधेरी विधानसभा मतदार संघ आहे. कॉस्मोपॉलिटन संस्कृतीचं चित्र असलं तरीही या विधानसभा मतदारसंघात अनेक नागरी समस्या आहेत. शिवसेना, भाजपचं वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात शिवसेनेचे रमेश लटके हे विद्यमान आमदार आहेत. यंदाच्या निवडणूकीमध्ये शिवसेनेचे रमेश लटके विरूद्ध कॉंग्रेसचे जगदीश अमिन यांच्यामध्ये प्रमुख लढत होणार आहे.

सध्या अस्तित्त्वात असलेल्या विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबरला संपणार आहे. 21 सप्टेंबरला निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू करत निवडणूकीची तारिख जाहीर केली आहे. 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे तर 24 ऑक्टोबरला मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif