Mumbai Shocker: 6 महिन्यांचा थकीत पगार देण्याचा तगादा लावला म्हणून मुंडण करून विवस्त्र धिंड काढत छळलेल्या तरूणाची आत्महत्या

पंकजने आत्महत्या केली तेव्हा त्याचे वडील पुण्यामध्ये होते.

Suicide Representational Image (Photo Credits: ANI)

दादरच्या प्रभादेवी भागामध्ये एका तरुणाने डोक्याचे मुंडण केल्याच्या काही तासांनंतर त्याच्या घरी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या गुरुवारी त्याच्या नोकरीच्या ठिकाणी दोन मालकांनी आणि त्यांच्या साथीदारांनी त्याला विवस्त्र करून त्याची परेड केली होती. मृत मुलाच्या वडिलांनी केलेल्या दाव्यानुसार, त्यांच्या मुलाने मागील सहा महिन्याचा पगार मागितला होता. त्या कारणावरून त्रास दिला जात होता. या प्रकरणी 2 आरोपी अटकेत आहेत. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, मृत मुलाच नाव पंकज जयस्वार आहे.

पंकज प्रभादेवी भागामध्ये रामराज जयस्वार यांच्यासोबत राहत होता. पंकजने आत्महत्या केली तेव्हा त्याचे वडील पुण्यामध्ये होते. जेव्हा त्यांनी मुलाचं पार्थिव नायर हॉस्पिटलमध्ये पाहिलं तेव्हा त्याच्या डोक्याचे मुंडन केल्याचं आणि डोक्यावर राख टाकून ते काळं केल्याचं दिसलं. Thane Shocker: हेअरकट आवडला नाही म्हणून 13 वर्षांच्या मुलाची आत्महत्या; 16 व्या मजल्यावरून मारली उडी .

पंकजने पगारासाठी तगादा लावला तेव्हा आरोपींनी त्याला त्रास देण्यास सुरूवात केली आहे. न्हाव्याकडे नेऊन त्याच मुंडण केलं. तोंड आणि डोकं याला राख लावली. स्थानिक भागामध्ये त्याची नग्न करून परेड देखील काढण्यात आली होती. तक्रारीवरून सध्या गुन्हा दाखल करून घेण्यात आला आहे. आयपीसी अंतर्गत विविध गुन्हे दाखल करून घेण्यात आले आहेत.