Mumbai: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला बेदम मारहाण करणाऱ्या पतीला अटक

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी सरकारकडून कठोर पावले उचलली जात असताना मुंबईतून (Mumbai) सर्वांना हादरून टाकणारी माहिती समोर आली आहे. शेजारी राहणाऱ्या एका पुरुषाशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून एका व्यक्तीने पत्नीला बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Mumbai: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला बेदम मारहाण करणाऱ्या पतीला अटक

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी सरकारकडून कठोर पावले उचलली जात असताना मुंबईतून (Mumbai) सर्वांना हादरून टाकणारी माहिती समोर आली आहे. शेजारी राहणाऱ्या एका पुरुषाशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून एका व्यक्तीने पत्नीला बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना पवईच्या (Powai) हरिओम नगर (Hari Om Nagar) येथे घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

रविशंकर चौहान (वय, 30) असे आरोपीचे नाव आहे. रविशंकर चौहान हा पवई येथील हरि ओम नगर येथील रहिवाशी आहे. रविशंकरला दारूचे व्यसन असून आपल्या पत्नीचे (वय, 23) शेजारी राहणाऱ्या पुरुषासोबत प्रेमसंबध असल्याचा त्याला संशय होता. रविशंकर हा नेहमी दारू पिऊन घरी आल्यानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्याशी झुज्जत घालत असे. मात्र, रविशंकर हा 6 मार्च रोजी पुन्हा दारू पिऊन घरी आल्यानंतर त्याने पत्नीशी वाद घालायला सुरुवात केली. दरम्यान, रविशंकरने पत्नीवर चारित्र्याच्या संबंधित आरोप केले. दरम्यान, रविशंकरने केलेल्या खोट्या आरोपांना महिलेने विरोध केला. यावर रविशंकर संतापला आणि स्वयंपाकघरात घरात जाऊन उलातणी गॅस स्टोवर ठेवून गरम केली. त्यानंतर त्याच उलातणीने पत्नीला मारण्यास सुरुवात केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. हे देखील वाचा- Antilia Bomb Scare: API Sachin Waze यांच्या निलंबनानंतर मुंबई पोलिस आयुक्तांवरील दबाव वाढला; Param Bir Singh यांची उचलबांगडी झाल्यास कोण होऊ शकत Mumbai Police Commissioner?

महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यात वरील घटनेने आणखी भर घातली आहे. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जात आहे. यासंदर्भात हिंदुस्थान टाईम्सने वृत्त दिले आहे.

(The above story first appeared on LatestLY on Mar 16, 2021 04:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).