Mumbai Shocker: धक्कादायक! नवऱ्याने केले बायकोचे न्यूड व्हिडिओ सोशल मीडियात पोस्ट, गुन्हा दाखल

बायकोसोबत परत राहता यावे यासाठी मुंबईतील एका 30 वर्षीय नवऱ्याने तिचे सोशल मीडियात न्यूड व्हिडिओ शेअर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Representative image

Mumbai Shocker: बायकोसोबत परत राहता यावे यासाठी मुंबईतील एका 30 वर्षीय नवऱ्याने तिचे सोशल मीडियात न्यूड व्हिडिओ शेअर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यासाठी अधिक तपास सुरु करण्यात आला आहे.(Palsavade Forest Ranger Beaten Case: महिला वनरक्षकास मारहाण प्रकरणाची आदित्य ठाकरे यांच्याकडून दखल)

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी आणि 28 वर्षीय तक्रारकर्त्या महिलेला 2 मुले आहे. ती ठाणे येथे राहते. नवऱ्यासह सासऱ्यांकडून महिलेला शारिरीक आणि मानसिक त्रास दिला जात होता. त्यामुळे त्यांच्या त्रासाला कंटाळून महिला आपल्या आईकडे मुलांसह निघून आली होती. महिलेने दाखल कुरार पोलिसात दाखल केलेल्या अर्जानुसार, गेल्या वर्षात नवऱ्याने आणि सासऱ्यांनी तिच्याकडे स्वतंत्र घर हवे असल्याची मागणी केली होती. या प्रकरणी नवऱ्याला पोलिसांनी समन्स धाडले असून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

आरोपीने पीडितेला पोलिसात तक्रार दाखल करुन नये यासाठी दबाब टाकत होता. तसेच मुलांसाठी तिने परत यावी यासाठी तो तिला आग्रही करत होता. परंतु तिने त्याचे काही ऐकले नाही. त्यानंतर एका महिन्याने तिची बहिण व्हॉट्सअॅप स्टेटस पाहत असताना तिने आरोपीने तिच्या बायकोची अंघोळ करतानाची व्हिडिओ स्टेटला ठेवल्याचे पाहिले.(Prisoner Suicide Case: आर्थर रोड कारागृहात कैद्याची आत्महत्या, कुटूंबियांनी केली चौकशीची मागणी)

नवऱ्याने ही क्लिप जेव्हा ते दोघे एकत्रित राहत होते तेव्हा काढली होती. तक्रारकर्त्या महिलेला माहिती सुद्धा नव्हते की, त्याने ती व्हिडिओ सोशल मीडियात टाकली असून सर्वांनी पाहिली होती असे अधिकाऱ्यांनी म्हटले. पीडितेच्या बहिणीने स्टेटसचा स्क्रिनशॉट काढून तक्रार दाखल करताना पुरावा म्हणून दिला आहे.

दरम्यान, या प्रकरणी पीडित महिलेने आरोपीच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर आरोपीवर एफआयआर दाखल करण्यात आला असून आयपीसी आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अॅक्ट नुसार कारवाई केली जाणार असल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी असे म्हटले की, आरोपी हा एका खासगी कंपनीत वरिष्ठ पदावर काम करतो. सध्या त्याचे लोकेशन पोलिसांकडून ट्रॅक केले जात आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif