Mumbai Shocker: व्हॉट्सॲपवर महिलांना अश्लील क्लिप पाठवणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी केली अटक

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, आरोपी मोहम्मद अजीज निसार खान (३६) मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. त्याची पत्नी आणि दोन मुले यूपीमध्ये राहतात, तर तो बेहरामपाडा, वांद्रे (पूर्व) येथे इतर रूममेट्ससोबत भाड्याने राहतो.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: File Photo)

Mumbai Shocker: महिलांना अश्लील व्हिडिओ पाठवून त्रास देणाऱ्या एका व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, आरोपी मोहम्मद अजीज निसार खान (३६) मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. त्याची पत्नी आणि दोन मुले यूपीमध्ये राहतात, तर तो बेहरामपाडा, वांद्रे (पूर्व) येथे इतर रूममेट्ससोबत भाड्याने राहतो. तो पराठ्या आणि हलव्याचे दुकान चालवतो. पोलिसांनी त्याच्या मोबाईल फोनची तपासणी केली असता आरोपीने सुमारे २५ महिलांना आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप पाठवून त्रास दिल्याचे निष्पन्न झाले. आरोपींविरुद्ध निर्मल नगर पोलिस ठाण्यात एका दाम्पत्याने तक्रार दाखल केली होती. पीडित महिलेने सांगितले की, 14 जून रोजी तिला एका अनोळखी नंबरवरून फोन आला होता. कॉलरने तिच्याशी अश्लील संवाद साधला, महिलेने कॉल डिस्कनेक्ट केल्यावर आरोपीने तिचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो व्हॉट्सॲपवर पाठवण्यास सुरुवात केली. हे देखील वाचा: Rape & Murder of Doctor at Kolkata Hospital: कोलकाताच्या आरजी कार मेडिकल कॉलेजच्या निवासी डॉक्टरांच्या मागण्या मान्य होईपर्यंत BMC MARD कडूनही 13 ऑगस्ट पासून Non-Emergency Medical Services बंद ठेवण्याचा निर्णय

महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. त्यानंतर सुमारे 2 महिन्यांनंतर सखोल चौकशीनंतर 36 वर्षीय आरोपी मोहम्मद अजीज निसार खान याला वांद्रे येथील बेहरामपाडा परिसरातून पकडण्यात आले. त्याच्याकडून दोन मोबाईल हँडसेटही जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी सांगितले की, आरोपी फार शिकलेला नाही, पण तो तंत्रज्ञान आणि गॅजेट्समध्ये खूप तरबेज आहे. ओळख लपण्यासाठी तो इतर महिला किंवा पुरुषांचा डीपी त्याच्या व्हॉट्सॲपवर ठेवायचा.

आरोपी नंबर डायल करायचा आणि जेव्हा कॉल घेणारी व्यक्ती  महिला असेल तेव्हा तो तिला डेटवर जाण्यास सांगायचा. यानंतर तो महिलांशी संबंध ठेवण्याच्या उद्देशाने त्यांना अश्लील व्हिडीओ पाठवायचा. पोलिसांच्या नजरेपासून दूर राहण्यासाठी तो दुसऱ्याच्या वाय-फाय नेटवर्कचा वापर करत असे. गुन्ह्यानंतर आरोपी आपला शोध लागू नये म्हणून मोबाईल बंद करत असे. त्यामुळे पोलिसांचा तपास वायफाय राऊटरच्या मालकापुरता मर्यादित राहिला.

मात्र, त्याचे लोकेशन ट्रॅक केल्यानंतर पोलिसांनी आठ दिवस त्याच्यावर नजर ठेवून त्याला अटक केली. तपासात आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरलेल्या आठ मोबाईल फोनचे आयएमईआय क्रमांक समोर आले आहेत. अश्लील व्हिडीओ आणि फोटो  पाठवून लैंगिक छळ केल्याबद्दल भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत आरोपींविरुद्ध आरोप दाखल करण्यात आले आहेत.