मुंबई: 2100 सालापर्यंत मुंबईतील समुद्राची पातळी 10 पटींनी वाढण्याची शक्यता, अभ्यासकांचे मत
संयुक्त राष्ट्राच्या Intergovernmental Panel on Climate Change(IPCC) च्या सर्वेक्षणानुसार, ही बाब उघड झाली आहे
मुंबईच्या समुद्रातील पाण्याच्या पातळीत 2100 सालापर्यंत 10 पटींनी वाढ होण्याची शक्यता आहे, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. संयुक्त राष्ट्राच्या Intergovernmental Panel on Climate Change(IPCC) च्या सर्वेक्षणानुसार, ही बाब उघड झाली आहे. ही मुंबईसाठी धोक्याची घंटा असून वेळीच ह्यावर तोडगा काढला नाही, तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असेही अभ्यासकांनी सांगितले आहे. असे झाल्यास आर्थिक नुकसान, पूरजन्य परिस्थिती, पायाभूत सुविधांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
IPCC ने दिलेल्या अहवालानुसार, तापमानात झालेल्या वाढीचा परिणाम समुद्र किनारी असलेल्या जीवनावर होऊ शकतो. तसेच 2100 सालापर्यंत समुद्राची पाण्याची पातळी 10 पटींनी वाढली तर त्याचा परिणाम मुंबई, कोलकता, सूरत, चेन्नई, कोची आणि विशाखापट्टणम येथील एकून 28 मिलियन लोकांना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंदमान, निकोबार आणि लक्षद्वीप बेटांवरील लोक काही वर्षांत स्थलांतरदेखील कऱण्याची शक्यता आहे. हेही वाचा- मुंबई: पाऊस, समुद्र भरतीमुळे अपत्कालीन स्थिती उद्भवल्यास BMC कडे संपर्क साधा ; करा 1996 आणि 101 या टोल फ्री क्रमांवर कॉल
मुंबईतील पायाभूत सुविधा आणि सांडपाण्याचा परिणाम येथील वातावरणावर होतो. ज्यामुळे हवामानात बदल होत असतो. त्यामुळे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी या सर्वांवर योग्य तो अभ्यास करून काहीतरी तोडगा काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असे SROCC च्या सहाय्यक अधिकारी अंजल प्रकाश यांनी सांगितले.
दुसरीकडे चक्रीवादळ, फयाण वादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळेही समुद्राच्या पातळीवर त्याचा परिणाम होतो. या सर्व गोष्टी लक्षात घेता याविषयी काही ठोस पावलं उचलण्याची गरज आहे असेही प्रकाश यांनी सांगितले आहे.