मुंबईत येत्या 12 डिसेंबर पर्यंत रॅली, मोर्चे-आंदोलन करण्यास बंदी, पोलिसांकडून कलम 144 लागू
त्यामुळे शहरात आता रॅली, मोर्चे किंवा आंदोलन करण्यास सक्तीने मनाई असणार आहेत. या संदर्भातील आदेश ही मुंबई पोलिसांनी जाहीर केले आहेत.
Mumbai: मुंबईत आज मध्यरात्री पासून येत्या 12 डिसेंबर पर्यंत कठोर निर्बंध लागू केले जाणार आहे. त्यामुळे शहरात आता रॅली, मोर्चे किंवा आंदोलन करण्यास सक्तीने मनाई असणार आहेत. या संदर्भातील आदेश ही मुंबई पोलिसांनी जाहीर केले आहेत. तर मालेगाव-अमरावती हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उलचण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.(Sameer Wankhede Case: समीर वानखेडेंच्या कुटुंबाबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल नवाब मलिकांनी मुंबई उच्च न्यायालयात मागितली माफी)
पोलिसांकडून जाहीर करण्यात आलेल्या आदेशात मालेगाव अमरावतीत झालेल्या हिंसाचाराचा संदर्भ दिला गेला आहे. तसेच ओमिक्रॉनचा धोका पाहता हा निर्णय घेतला गेला आहे. त्यामुळेच आता कोणत्याही प्रकारचे मोर्चे, रॅली किंवा आंदोलन करण्यास परवानगी नसणार आहे.
Tweet:
दरम्यान, देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली. आज आपला देश अमृत मोहोत्सव साजरा करत आहे. त्याच संदर्भात एमआयएम पार्टीकडून उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करत मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे आणि महाराष्ट्रातील वक्फ संपत्तीचे संरक्षण व्हावे अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळेच आज तिरंगा रॅली काढली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. ही रॅली संध्याकाळ पर्यंत मुंबईत दाखल होईल असे ही सांगण्यात आले होत. त्यानंतर एक सभा सुद्धा होईल. या सभेला एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन औवेसी संबोधित करणार असल्याचे म्हटले होते. परंतु आता निर्बंध लागू केल्यानंतर काय घडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Tweet:
तर त्रिपुरा मध्ये झालेल्या हिंसाचाराचे प्रतिसाद महाराष्ट्रात उमटल्याचे समोर आले होते. या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील अमरावती-नांदेडसह अन्य ठिकाणी मुस्लिम समाजाकडून निदर्शने केली गेली. त्याला हिंसक वळण लागल्याचे सुद्धा दिसून आले होते. यामध्ये काही जणांना अटक ही केली होती तर अमरावतीत संचारबंदी आणि इंटरनेट सेवा बंद ठेवण्याची वेळ आली होती.