BEST, Adani Electricity Officials Meeting With Raj Thackeray: बेस्ट व अदानी इलेक्ट्रिसिटी ला राज ठाकरेंचा इशारा; वाढीव वीज बिलं कमी झालीच पाहिजेत नाही तर लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल
या बैठकीत राज ठाकरेंनी वीज कंपन्यांच्या अधिकार्यांना लोकांची वाढीव वीज बिलं कमी झालीच पाहिजेत नाहीतर तुम्हाला लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असे सांगितले आहे.
मार्च महिन्यापासून कोरोना व्हायरस लॉकडाऊनमध्ये सामान्यांना भरमसाठ वीज बीलांचा सामना करावा लागत आहे. यामध्ये सरकार कडूनही दिलासा मिळत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) खळ्ळ खट्याक आंदोलन सुरू होते. त्याच पार्श्वभूमीवर आज शिवाजी पार्क येथील राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) निवासस्थानी बेस्ट (BEST) आणि अदानी इलेक्ट्रिसिटीच्या (Adani Electricity ) अधिकार्यांसोबत बैठक झाली आहे. या बैठकीत राज ठाकरेंनी वीज कंपन्यांच्या अधिकार्यांना लोकांची वाढीव वीज बिलं कमी झालीच पाहिजेत नाहीतर तुम्हाला लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असे सांगितले आहे.
दरम्यान कृष्णकुंज या राज ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर मनसे नेते बाळ नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांनी माहिती देताना कोरोना संकटकाळात आधीच सामान्य जनता आर्थिक विवंचनेमध्ये आहे. अशावेळी ववाढीव वीज दर कमी होणं गरजेचे आहे. त्यावर दोन्ही कंपन्यांना अद्याप कोणतीही डेडलाईन देण्यात आलेली नाही पण ते राज ठाकरेंचा इशारा समजून घेतील आणि योग्य पावलं उचलतील असा विश्वास मनसे नेत्यांनी व्यक्त केला आहे. 'अन्यथा या खाजगी वीज कंपन्यांना आम्हाला झटका द्यावा लागेल' वाढीव वीजबिलाच्या मुद्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र.
MNS Tweet
कोरोना संकटकाळात योग्य मीटर रीडिंग घेतले गेले नव्हते त्यामुळे अनेकांना वीज कंपनीकडून सरासरीवीज पाठवण्यात आले. मात्र वीज बीलाचा आकडा पाहून अनेकांना घाम फूटला आहे. त्यावर उर्जामंत्र्यांनी देखील वर्क फ्रॉम होममुळे बील वाढले असेल असे सुरूवातीला उत्तर दिले होते. त्यानंतर टप्प्या टप्प्याने वीज भरायचा सल्ला देण्यात आला आहे.