Mumbai Rains Update: मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस; लोकल रेल्वे सेवेस विलंब, सकल भागात पाणी साचल्याने वाहतूक खोळंबली

रात्रभर संततधार कोसळत असलेल्या या पावसामुळे मुंबई लोकल, रस्तेवाहतूक (Mumbai Traffic Updates) आणि इतर पर्यायी व्यवस्थेवरही परिणाम झाला आहे.

Mumbai Rains | Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुंबई शहर (Mumbai Rains) आणि उपनगरांमध्ये शनिवारी (20 जुलै) पहाटेपासून मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळतो आहे. रात्रभर संततधार कोसळत असलेल्या या पावसामुळे मुंबई लोकल, रस्तेवाहतूक (Mumbai Traffic Updates) आणि इतर पर्यायी व्यवस्थेवरही परिणाम झाला आहे. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर विलेपार्ले येथील सखल भाग पाण्याखाली गेला आहे. आयएमडीने हवामान अंदाज (IMD Weather Forecas) वर्तवताना पावसाबाबत आगाऊ सूचना दिली होती. दरम्यान, मुसळधार पावसामुळे इतर ठिकाणीही अनेक रस्त्यांवर पाणी साचले आहे. त्यामुळे रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. तिन्ही रेल्वे मार्गावरील लोकस विलंबाने धावत आहेत. ज्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लाग आहे.

बीएमसी अलर्टवर

हवामान विभागाने दिलेला इशारा आणि पावसामुळे निर्माण होणारी संभाव्य परिस्थीत यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) हाय अलर्टवर आहे. रस्त्यांवर साचलेले पाणी आणि विस्कळीत झालेली परिस्थीती पाहता, खबरदारीचा उपाय म्हणून अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत. वाहतूक कोंडी टाळून परिस्थिती हाताळण्यासाठी वाहतूक वेगवेगळ्या मार्गांवर वळवण्यात आली आहे. (हेही वाचा, Weather Forecast India: महाराष्ट्र, गुजरात राज्यात मुसळधार पाऊस, हवामान अंदाज वर्तवताना IMD कडून Red Alert जारी)

सकल भागात पाणी साचल्याने वाहतूक मार्गात बदल

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) पुढील दोन दिवस मुसळधार पावसाबाबत हवामान अंदाज  वर्तवत यलो अलर्ट जारी केल्याने मुंबई आणि बीएमसीसमोरील आव्हाने वाढण्याची शक्यता आहे. मुंबईत गुरुवारपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शुक्रवारी सकाळी 8 ते रात्री 9 वाजेदरम्यान शहरात 52.89 मिमी पावसाची नोंद झाली. शीतला सिनेमा येथे पाणी साचले आहे. परिणामी मार्ग क्रमांक 7, 302, 303, 517, आणि 322 उत्तरेकडे जाणाऱ्या बसेस त्यांच्या नियमित मार्गावर परतण्यापूर्वी जुना आग्रा रोड कमानी येथून मगन नथू राम रोड आणि काळे मार्गे वळवण्यात आल्या आहेत. (हेही वाचा, Mumbai Weather Forecast Today: मुंबईत मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा हवमान विभागाचा अंदाज)

आणखी मुसळधार पावसाची शक्यता

मान्सूनच्या जोरदार पावसाचा महाराष्ट्रावर परिणाम होत असून, येत्या 24 तासांत आणखी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. शनिवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि गोवा भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई व्यतिरिक्त, IMD ने पुणे, ठाणे, नाशिक आणि पालघरसह राज्यातील 12 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

देशभरातील इतर राज्यामध्येही मुसळधार पाऊस

पुढील दोन दिवसांत कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि यानाम या दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाजही आयएमडीने वर्तवला आहे. IMD च्या शनिवारच्या दैनंदिन हवामान बुलेटिननुसार, उडुपी आणि उत्तर कन्नडसाठी रेड अलर्टची सूचना देत मुसळधार पाऊस कर्नाटकला धडकणार आहे. हवामान विभागाने 20 जुलै रोजी उत्तरा कन्नड, शिमोगा, उडुपी आणि चिकमंगळूर जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.