Mumbai Rains Traffic Update: हिंदमाता, सायन परिसरात ट्राफिक जॅम टाळण्यासाठी वाहतूक मार्गांमध्ये बदल; BMC चं ट्विट
मुंबईमध्ये आज (28 जून) सकाळपासून पावसाला सुरूवात झाली आहे. पावसाचा जोर कायम असल्याने अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. त्यामुळे होणर्या वाहतूक कोंडीमधून मुंबईकरांची सुटका व्हावी याकरिता बीएमसीने सायन, हिंदमाता परिसरात वाहतूक वळवली आहे.
Mumbai Traffic Advisory: मुंबईमध्ये मान्सून आला होता पण पाऊस कधी पडणार? हा प्रश्न अनेकांना सतावत होता. मात्र आज सकाळपासून मुंबई, ठाणे, पालघर सह महाराष्ट्रात धुव्वाधार पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबईत पहिलाच पाऊस जोरदार असल्याने अनेक सखल भागात पाणी साचल्याने वाहतूककोंडी झाली आहे. पश्चिम, पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूकीचा वेग मंदावल्याने वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत बीएमसीकडून अनेक ठिकाणी ट्राफिक वळवण्यात आलं आहे. Maharashtra Monsoon 2019 Live Updates: साचलेल्या पाण्याचा संध्याकाळपर्यंत निचरा होईल, मुंबई महानगरपालिकेचे आशादायी ट्विट
मुंबईत वाहतुकीचे मार्ग बदलले
मुंबईमध्ये वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी काही ठिकाणी बदल करण्यात आले आहेत. सायन, हिंदमाता परिसरात हे बदल करण्यात आले आहेत. आज संध्याकाळ पर्यंत पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं बीएमसीकडून सांगण्यात आलं आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)