Mumbai Rains: मुंबईत पाऊस, नेटीझन्स खूश; सोशल मीडियावर मिम्सचा वर्षाव, अनेकांनी शेअर केले रोमँटीक फोटो

पावसाने दिलेला शिडकावा आणि त्यामुळे वातावरणातील कमी झालेला दाह पाहून मुंबईकर खूश झाले आहेत. अनेक मुंबईकरांनी #MumbaiRains या हॅशटॅगखाली अगदी मजेशीर मिम्स (Mumbai Rains Mims) शेअर केले आहेत.

Mumbai Rains and Mims | (Photo Credits: Twitter)

Romantic Photos Of Mumbai Rains: मुंबई शहरात आज पहाटे पावसाने दमदार (Mumbai Rains) हजेरी लावली. पावसाने दिलेला शिडकावा आणि त्यामुळे वातावरणातील कमी झालेला दाह पाहून मुंबईकर खूश झाले आहेत. अनेक मुंबईकरांनी #MumbaiRains या हॅशटॅगखाली अगदी मजेशीर मिम्स (Mumbai Rains Mims) शेअर केले आहेत. तर काहींनी अगदी रोमँटीक अंदाजात फोटो. राज्यात अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने या आधीच वर्तवली आहे. त्यानुसार राज्यातील विविध भागांमध्ये अवकळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. काही ठिकाणी गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसानही झाले आहे. मात्र असे असले तरी मुंबईत मात्र पावसाने म्हणावी तशी हजेरी लावली नव्हती. आता मात्र मुंबईत पासाने हजेरी लावल्याने मुंबईकरांची दमट वातावरण आणि उकाड्यापासून काहीशी सुटका होणार आहे.

अनेक मुंबईकरांनी मरीन ड्राईव्ह, जुहू चौपाटीवरील पावसाचे फोटो शेअर केले आहेत. काही मुंबईकरांनी घराबाहेर न पडता खिडकीतून दिसणारा मोजकाच पाऊस हातातील मोबाईल कॅमेऱ्याने टीपला आहे. ते फोटो मुंबईकरांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. हे फोटो पाहून नेटीझन्स भलतेच खूश झाले असून त्यांनी या फोटोंकाली मजेशीर प्रतिक्रिया दिल्याच आहेत. पण, खास करुन सोशल मीडियावरील काही वापरकर्ते मात्र काहीसे अधिकच उत्साही झाले आहेत. त्यांनी हटके मिम्स शेअर केले आहेत. (हेही वाचा, Thane Rains and Weather update: ठाणे जिल्ह्यात विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह दमदार पाऊस, सामान्यांची तारांबळ)

ट्विट 

ट्विट 

ट्विट 

ट्विट 

एका ट्विटर वापरकर्त्याने मिम्स शेअर करत ओला आणि उबेर चालकांचा संवाद दाखवला आहेत. त्यात एक चालक दुसऱ्याला म्हणतो... चला आज पाऊस म्हणजे पैसाच पैसा होणार. दुसऱ्या एका मिम्स मध्ये ओला चालक सोबत एकमेकांना म्हणतात चला आज पैसाच पैसा. एका ट्विटर वापरकर्त्याने आभाळ आणि वातावरणाचा फोटो शेअर करत मातीचा गंध असलेला सुगंधी पाऊस असे म्हटले आहे.

ट्विट 

ट्विट 

ट्विट 

ट्विट 

दरम्यान, मुंबई शहरासोबत मुंबई उपनगर आणि नजिकच्याच ठाणे, रायगड अशा जिल्ह्यांमध्येही आज सकाळी पावसाची उपस्थिती पाहायला मिळाली. भल्या सकाळी पाऊस अचानक आल्याने मॉर्निंग वॉकला गेलेल्या आणि कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली.