Mumbai Waterlogging: पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाल्यानंतर बीएमसी कडून 4 पंप ऑपरेटर्सना 40 लाखांचा दंड

सोमवारी मुंबई मध्ये झालेल्या पहिल्याच जोरदार पावसामध्ये अनेक सखल भागामध्ये पाणी साचलं होतं. यामध्ये हिंदमाता, गांधी मार्केट, यलो गेट आणि चुनाभट्टी चा समावेश होता. पाणी साचल्याने रहदारीला मोठा फटका बसला. रेल्वेची सेवा देखील कोलमडल्याचं चित्र पहायला मिळालं.

BMC Office | File Phot

मुंबई महानगर पालिकेकडून (BMC) मुंबईमध्ये पहिल्याच पावसात पाणी साचल्याने झालेल्या गोंधळावर आता कारवाई करण्यात आली आहे. साचलेलं पाणी साफ करू न शकल्याप्रकरणी चार मिनी पंपिंग स्टेशन ऑपरेटर्सना (mini pumping station operators) बीएमसी ने दंड ठोठावला आहे. या कॉन्ट्रॅक्टर्सना पालिकेने 40 लाखांचा दंड ठोठावला आहे. 25 मे या डेडलाईन पर्यंत त्यांच्याकडून रेनवॉटर पम्प इंस्टॉल न झाल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

सोमवारी मुंबई मध्ये झालेल्या पहिल्याच जोरदार पावसामध्ये अनेक सखल भागामध्ये पाणी साचलं होतं. यामध्ये हिंदमाता, गांधी मार्केट, यलो गेट आणि चुनाभट्टी चा समावेश होता. पाणी साचल्याने रहदारीला मोठा फटका बसला. रेल्वेची सेवा देखील कोलमडल्याचं चित्र पहायला मिळालं.

सोमवारी 13 तासामध्ये मुंबई शहरात 250 mm इतका रेकॉर्डब्रेक पाऊस झाला आहे. बीएमसी चे कर्मचारी रस्त्यावर उतरून काम करत असले तरीही मुंबई मधील या चार सखल भागामध्ये पाण्याचा निचरा होत नव्हता. परिणामी या भागात जनजीवन ठप्प पडलं होतं.

चारही ऑपरेटर्सना प्रत्येकी 10 लाखाचा दंड ठोठावण्यात आला होता. टेंडर मधील अटींनुसार त्यांच्याकडून वेळेत ड्रेनेज सिस्टीम पुरवली न गेल्याने मोठा फटका बसला. हे मिनी-पंपिंग स्टेशन बीएमसीच्या पावसाळी तयारी योजनेचा एक भाग होते, ज्याचा उद्देश सखल भागातून पावसाचे पाणी काढून टाकणे, जेणेकरून वाहतूक सुरळीत राहील आणि पाणी साचण्याचा त्रास कमी होईल.

चुनाभट्टी भागात जिथे पाऊस कमी होता, तरीही पंप पूर्ण क्षमतेने काम करू शकले नाहीत. बीएमसी अधिकाऱ्यांनी ही कमतरता लक्षात घेतली आणि असा निष्कर्ष काढला की कंत्राटदारांनी निविदेत नमूद केलेल्या ऑपरेशनल टाइमलाइन आणि तांत्रिक आवश्यकतांचे पालन केले नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement