Mumbai Rain Update: मुंबईत पावसाचा जोर वाढला, अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद
त्यामुळे पुन्हा अंधेरी सबवेखाली पुन्हा पाणी साचले आहे.
मुंबईसह (Mumbai) उपनगरामध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस (Heavy Rainfall) हा पडत असून यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. या पावसाचा वाहतुकीवर देखील परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे. अंधेरीच्या सबवे परिसरात देखील पाणी साचले असून अंधेरी सबवे (Andheri Subway) हा सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मुंबईतील इतर ठिकाणी देखील पावसामुळे वाहतुक कोंडी झाली आहे. गेल्या तासाभरापासून मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस कोसळत आहेय. यामुळे मुंबई उपनगरातील अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या सबवेखाली देखील पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. (हेही वाचा - IMD Weather Forecast: आयएमडीने वर्तवला हवामानाचा अंदाज, रत्नागिरी जिल्ह्यात उद्या 'रेड' अलर्ट)
आज दिवसभरात दुसऱ्यांदा अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे वाहन चालकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. आज सकाळी साधारणपणे साडेअकरा वाजण्याच्या सुमारास सबवे वाहतुकीसाठी तासाभरासाठी बंद करण्यात आला होता. मात्र दुपारी तीन वाजल्यापासून मुंबईत पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे पुन्हा अंधेरी सबवेखाली पुन्हा पाणी साचले आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक पोलिसांनी अंधेरी सबवे गेल्या वाहतुकीसाठी बंद केला आहे. त्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.