मुंबई शहर-उपनगरांमध्ये पुन्हा दमदार पावसाला सुरूवात
नागरिक, पर्यटक आणि मच्छिमार्यांनी पुढील काही दिवसांसाठी समुद्रात न जाण्याचे आवाहन देखील आपत्ती निवारण कक्ष आणि हवामान खात्याने नागरिकांना दिला आहे.
आज (14 जून) मुंबईकरांच्या विकेंडला परफेक्ट सुरूवात झाली आहे. सध्या महाराष्ट्रात मान्सूनची प्रतिक्षा आहे. परंतू अरबी महासागरातील 'वायू' चक्रीवादळामुळे हवामानात सुखद बदल झाला आहे. मुंबई सह उपनगरांमध्ये आज दिवसभर पावसाच्या सरी बरसत होत्या. मात्र आता संध्याकाळच्या वेळेस मुंबईसह उपनगरांमध्ये दमदार पावसाला सुरूवात झाली आहे. वार्यालाही वेग असल्याने मुंबईकरांनी सावधता बाळगावी असा इशारा देण्यात आला आहे. Monsoon Update: समाधानकारक पावसासाठी मुंबईकरांना करावी लागणार अजून 7 दिवस प्रतिक्षा
वायू चक्रीवादळ अरबी सागरात पश्चिम किनारपट्टीवर निर्माण झालं होतं. महाराष्ट्र, गुजरात समुद्र किनार्यालगत त्याचा परिणाम पहायला मिळाला आहे. सध्या या चक्रीवादळाचा धोका टळला असला तरीही सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.
नागरिक, पर्यटक आणि मच्छिमार्यांनी पुढील काही दिवसांसाठी समुद्रात न जाण्याचे आवाहन देखील आपत्ती निवारण कक्ष आणि हवामान खात्याने नागरिकांना दिला आहे.