Mumbai Railway Mega Block: मुलुंड ते माटुंगा दरम्यान आज रात्री मध्य रेल्वेचा 4 तासांचा मेगाब्लॉक
याकरिता मुलुंड ते माटुंगा दरम्यान आज शनिवारी रात्री 4 तासाचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत
मुंबई मध्य रेल्वेच्या विद्याविहार स्थानकाजवळील जुना पादचारी पूलाची अवस्था बिकट झाली असून तो तोडण्याचा रेल्वे प्रशासनाने निर्णय घेतला आहे. याकरिता मुलुंड ते माटुंगा दरम्यान आज शनिवारी रात्री 4 तासाचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. यामुळे रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. हा ब्लॉक 7 मार्च रात्री 11.15 ते रविवारी 8 मार्च 3.15 वाजेपर्यंत असणार आहे. परिणामी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण/ खोपोली मार्गावरील लोकलच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होणार आहे. दरम्यान, ठाणे, कल्याण, अंबरनाथ या लोकल केवळ कुर्लापर्यंतच चावलण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना रात्रीच्या प्रवासाचे नियोजनच करावे लागणार आहे. महत्वाचे म्हणजे, मेल/एक्स्प्रेस गाड्यांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे.
7 मार्च रोजी रद्द केलेल्या डाऊन फेऱ्या-
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण- रात्री 9.54 वाजता.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे- रात्री 11.04, रात्री 11.12 वा, रात्री 11.39 वा, रात्री 11.59 वा, रात्री 12.28
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला- रात्री 11.25 वा, रात्री 11.48 वा, रात्री 12.31 वा.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते टिटवाळा- रात्री 11.44 वा.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते अंबरनाथ- रात्री 11.52 वा, रात्री 12.05
7 मार्च रोजी रद्द केलेल्या अप लोकल फेऱ्या-
डोंबिवली ते सीएसएमटी- रात्री 10.18 वा.
अंबरनाथ ते सीएसएमटी- रात्री. 10.01 वा.
टिटवाळा ते सीएसएमटी- रात्री 10.06 वा.
कल्याण ते सीएसएमटी- रात्री 10.26 वा., रात्री 11.05 वा.
डोंबिवली ते दादर- रात्री 10.48 वा.
कल्याण ते दादर- रात्री 11.10 वा.
बदलापूर ते कुर्ला- रात्री 11.04 वा.
टिटवाळा ते ठाणे- रात्री 11.14 वा.
कल्याण ते ठाणे- 11.47 वा.
एसएमटी ते कुर्लापर्यंतच धावणाऱ्या गाड्या
परळ ते कल्याण- रात्री 8.59 वा, रात्री 10.03 वाजता सुटून कुर्लापर्यंतच धावतील.
सीएसएमटी ते डोंबिवली- रात्री 8.48 आणि रात्री 9.41 वाजता सुटून कुर्लापर्यंतच धावतील.
दादर ते कल्याण- रात्री 9.17 वा कुर्लापर्यंतच धावतील.
सीएसएमटी ते कल्याण- रात्री 10.04 वा, रात्री 10.16 वा. रात्री 10.24 ची लोकल कुर्लापर्यंतच धावणार
सीएसएमटी ते बदलापूर- रात्री 9.08 ची लोकल अंबरनाथपर्यंत धावणार.
रेल्वेतून प्रवास करण्याऱ्या प्रवाशांसाठी वरील माहिती उपयोगी ठरणार आहे. घरातून बाहेर निघताना या वेळापत्रकावर एकदा नजर टाका. ज्यामुळे तुम्हाला प्रवासाचे नियोजन करता येईल.