1 ऑगस्टपासून आता मुंबई रेल्वे पोलिसही ऑनड्युटी 'आठ तास', रेल्वे प्रशासनाचा महत्वपुर्ण निर्णय

रेल्वे प्रवाशांसाठी अहोरात्र तैनात असणा-या रेल्वे पोलिसांनाही (Railway Police) आता केवळ 8 तास ड्युटी करावी लागणार आहे. गेल्या अडीच वर्षांपासून आठ तासांच्या ड्युटी करावी अशी रेल्वे पोलिसांची मागणी होती. त्यामुळे त्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने हा महत्त्वपुर्ण निर्णय घेतला आहे. येत्या 1 ऑगस्टपासून हा नवीन नियम लागू होईल.

Railway Police (Photo Credits: Facebook)

रेल्वे प्रवाशांसाठी अहोरात्र तैनात असणा-या मुंबई रेल्वे पोलिसांनाही (Railway Police)  आता केवळ 8 तास ड्युटी करावी लागणार आहे. गेल्या अडीच वर्षांपासून आठ तासांच्या ड्युटी करावी अशी रेल्वे पोलिसांची मागणी होती. त्यामुळे त्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने हा महत्त्वपुर्ण निर्णय घेतला आहे. येत्या 1 ऑगस्टपासून हा नवीन नियम लागू होईल. रेल्वे पोलिसांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. याआधी ही असा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र त्यांची नीट अंमलबजावणी झाली नाही.

महाराष्ट्र टाईम्स च्या बातमीनुसार, 1 जानेवारी 2018 रोजी मुंबई पोलिस दलातील तत्कालीन आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी मुंबई पोलिसांना आठ तास ड्युटी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर मुंबई रेल्वे पोलीस दलातील अधिकारी-कर्मचारी वर्गानेही आठ तास ड्युटीची मागणी जोर धरू लागली होती. त्याचाच परिणाम म्हणून आता एक ऑगस्टपासून रेल्वे पोलिसांनाही आठ तास ड्युटी असणार आहे.

हेही वाचा- घरातून पळून गेलेल्या 718 मुलांना पश्चिम रेल्वेने केले त्यांच्या कुटूंबियांकडे सुपूर्त

जनतेच्या रक्षणासाठी अहोरात्र झटणा-या रेल्वे पोलिसांना वेळेची मर्यादा नसते. नेहमी दिलेल्या तासाच्या वरच त्यांना काम करावे लागते. ज्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर होतो. तर कित्येकदा पोलिसांनी मानसिक ताण-तणावालाही सामोरे जावे लागते. जनतेच्या रक्षणासाठी असलेले हे पोलीस आपल्या कुटूंबाला किंबहुना स्वत:ला हवा तितका वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे माणुसकीच्या दृष्टीने विचार करता रेल्वे प्रशासनाचा हा निर्णय खरच स्तुत्यप्रिय असा आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now