Mumbai Pune Sinhagad Express मध्ये प्रवाशांच्या वाढत्या मारहाणीच्या घटनांनतर आता अखेर 1 अतिरिक्त डब्बा जोडण्याचा निर्णय; 1 मे पासून अंमलबजावणी

सिंहगड एक्सप्रेस मध्ये आता 120 अधिक प्रवाशांना घेऊन धावणार आहे.

Train | File Image

मुंबई- पुणे प्रवास करणार्‍यांना महाराष्ट्र दिनाचं एक रिटर्न गिफ्ट मिळाला आहे. सीएसएमटी ते पुणे दरम्यान धावणारी सिंहगड एक्सप्रेस आता 16 डब्ब्यांची होणार आहे. 11009-11010 या ट्रेनला आता अजून एक सेकंड क्लास चेअर कार डब्बा जोडला जाणार आहे. त्यामुळे अधिक प्रवासी या ट्रेनने प्रवास करू शकणार आहेत. त्यामुळे 1 मे पासून प्रवास करणार्‍यांनी आता आपल्या तिकीटांची कन्फर्मेशन पाहून घ्यावीत असा सल्ला देण्यात आला आहे.

पास धारक आणि इतर प्रवाशांमधील वाद टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आला आहे. सिंहगड एक्सप्रेस मध्ये आता 120 अधिक प्रवाशांना घेऊन धावणार आहे. नव्या रचनेनुसार आता सिंहगड एक्सप्रेसला आता एक एसी चेअर कार, १३ द्वितीय श्रेणी बैठक आसने, एक सामान कम ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर डबा असणार आहे. Mumbai Metro Fare Discount: शिंदे सरकारचं आता ' 'मुंबई मेट्रो' प्रवाशांना महाराष्ट्र दिनाचं गिफ्ट! जेष्ठ नागरिक, दिव्यांग, विद्यार्थ्यांच्या तिकीटात सवलत जाहीर .

सिंहगड एक्स्प्रेसमध्ये काही दिवसांपूर्वीच मारहाणीची अजून एक घटना समोर आली आहे. या घटनेत, एका 37 वर्षीय व्यक्तीवर सीटवरून झालेल्या भांडणानंतर लोकांच्या गटाने हल्ला केला. आधीच ट्रेनमध्ये चढलेल्या एकाने त्याच्या सहकाऱ्यांसाठी आणखी दोन जागा धरल्या होत्या. मात्र, तेथे कोणीही न बसलेले पाहून बसायल्या गेलेल्याला 7-8 जणांनी मारले. याप्रकरणी सात अज्ञातांविरुद्ध पोलिसांत तक्रार नोंदवली गेली होती. पण या घटना सातत्याने घडत असल्याने आता हा डब्बा वाढवून वाद शमवण्याचे प्रयत्न आहेत.

दरम्यान अनेक जण नियमित कामानिमित्त मुंबई-पुणे प्रवास करत असतात. अशावेळी काही जण ग्रुपने प्रवास करतात.