मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वर आता 120 KMPH वर चालवा गाडी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ठरावाला मंजुरी
मुंबई पुणे एक्सप्रेस वे (Mumbai Pune Express Way) वर यापुढे चारचाकी वाहनाच्या चालकांना ताशी 120 किमीच्या वेगाने गाडी चालवण्यास परवानगी देण्याचा ठराव केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मंजूर केला आहे. याआधी अनेक वर्ष हा वेग ताशी 80 किमी इतकाच मर्यादित ठेवण्यात आला होता. मागील काही दिवसांपासून रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या (Road, Transport And Highways Ministry)अंतर्गत एक समिती या महामार्ग व एक्सप्रेसवेवरील वाहनांच्या वेगाचे परीक्षण करत होती, यातील निरीक्षणानंतर आता हा वेगवाढीला परवानगी देणारा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे मिररच्या वृत्तानुसार, अपघात टाळण्याच्या दृष्टिकोनातून या एक्सप्रेवेवर वाहनाचा वेग मर्यादित ठेवण्यात आला होता, याचे उल्लंघन केल्यास चालकांना मोठा दंड देखील आकाराला जात असे, मात्र आता या नव्या नियमानुसार खाजगी वाहन चालकांना ताशी 120 किमी पर्यंत वेग वाढवता येणार आहे, तसेच राज्य सरकारच्या व खाजगी बस ना सुद्धा ताशी 100 किमी इतक्या वेगात वाहन चालवण्याची अनुमती देण्यात येणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाला देखील सूचित करण्यात आले आहे. तूर्तास हा निर्णय घेण्यात आला असला तरी येत्या आठवड्यात याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. त्याआधी या मार्गावरील काही दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात येतील. खुशखबर! ड्रायव्हिंग लायसन्स च्या नियमामध्ये झाला हा मोठा बदल; 22 लाखांपेक्षा जास्त लोकांना मिळेल रोजगार
दरम्यान एप्रिल 2018, मध्ये देशातील विविध राष्ट्रीय महामार्ग तसेच एक्सप्रेसवे वर वाहनांचा वेग हा ताशी 80 किमी वरून 100 किमी करण्यात आला होता, मात्र, मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर सातत्याने होणारी अपघात, दरड कोसळण्याच्या घटना पाहता रस्ते विकास मंडळाने या मार्गावरील वाहनांच्या वेगवाढीला ट्युरी दर्शवली नव्हती. याशिवाय सेव्ह लाईफ या सामाजिक संस्थेतर्फे काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात वाहनाचा वेग हे अपघटनाचे मुख्य कारण असल्याचे सांगितले गेले होते. या अहवालात मुंबई पुणे मार्गावर 65 % वाहनचालक हे वेगाची मर्यादा व अन्य वाहतुकीचे नियम पाळत नसल्याचे देखील दिसून आले होते.