Mumbai-Pune Expressway वर लॉंग विकेंडच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी

मीडीया रिपोर्ट्सनुसार, आज पुणे-मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी मुळे सुमारे 12 किमी च्या रांगा पहायला मिळत आहेत

Mumbai Pune Expressway Traffic | (Photo Credit - Twitter)

शनिवार-रविवारची सुट्टी आणि मंगळवारी त्याला जोडून आलेला स्वातंत्र्यदिन यामुळे अनेक नोकरदारांनी सोमवारी (14 ऑगस्ट) एक दिवसाची सुट्टी घेत लॉंग विकेंड (Long Weekend)  एंजॉय करण्याचा प्लॅन केला आहे. परिणामी आज मुंबई बाहेर पडताना अनेक ठिकाणी लांबच लांब रांगा दिसत आहेत. पुणे-मुंबई एक्सप्रेस (Mumbai-Pune Expressway) वर आज सकाळपासूनच वाहनांच्या रांगा बघायला मिळत आहेत. खंडाळा बोरघाटामध्ये वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. सलगच्या सुट्ट्यांमुळे पुण्याकडे येणारी वाहतूक संथ गतीने सुरू आहे.

पावसाने सध्या विश्रांती घेतली असल्याने मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर दरडी कोसळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. अन्यथा मागील काही आठवड्यात दरडींमुळेही वाहतूक मंदावली होती. अनेक जणांनी या सुट्ट्यांमध्ये गाव गाठल्याने घाटात वाहतूक कोंडी आहे.

पहा ट्वीट

मीडीया रिपोर्ट्सनुसार, आज पुणे-मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी मुळे सुमारे 12 किमी च्या रांगा पहायला मिळत आहेत. त्यामुळे वाहनं अगदीच कुर्मगतीने पुढे सरकत आहेत. मागील काही आठवड्यांमध्ये घाट परिसरामध्ये पावसाची संततधार सुरू असल्याने प्रशासनाला खास ब्लॉक घेऊन दरडी हटवाव्या लागत होत्या. तेव्हाही वाहतूक मंदावली होती. आता 13 ऑगस्ट पासून पाऊस पुन्हा महाराष्ट्रात कमबॅक करण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.

दरम्यान भुसावळ मनमाड सेक्शन मध्ये रेल्वेने काम हाती घेतल्याने काही ट्रेनच्या फेर्‍या देखील 14,15 ऑगस्ट दरम्यान रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळेही अनेक जण रस्ते मार्गे प्रवास करत आहेत.