Mumbai Pune Expressway Block Update: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर 27 ते 29 जानेवारी दरम्यान 3 दिवसांचा ब्लॉक, वाहतुकीत कोणते बदल होणार?

एक्स्प्रेस वेवरील मिसिंग लिंकच्या कामासाठी डोंगरगाव ते कुसगाव हा अंडरपास तोडला आहे. तेथे नव्या पुलांच्या बांधणीच्या कामांसाठी ब्लॉक घेण्यात आला आहे.

Mumbai Pune Expressway (Photo Credits: x/@CivilEngDis)

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे (Mumbai Pune Expressway)  वर 27 ते 29 जानेवारी दरम्यान तीन दिवसांचा ब्लॉक असणार आहे. आता त्यादृष्टीने वाहतूकीमध्ये बदल करण्यात आले आहेत. या ब्लॉकच्या दिवशी सकाळी 12 ते दुपारी 3 यावेळेत वाहतुकीमध्ये बदल करण्यात येणार आहेत. पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक आता वरसोली टोलनाका (Varsoli Toll Naka) वरून देहू रोड मार्गे वळवली आहे. दुपारी 3 नंतर पुण्याच्या दिशेची वाहतूक पुन्हा एक्सप्रेस वे वरून चालवली जाणार आहे.

या भागात स्थानिक वाहतुकीसाठी फ्लायओव्हर्स उभारले जात आहेत. दरम्यान या भागात स्थानिक वाहतुकीसाठी फ्लायओव्हर्स उभारले जात आहेत त्याचाच कामासाठी आता मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर 3 दिवसांचा ब्लॉक असणार आहे.

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर वाहतूकीमध्ये हा बदल केवळ मुंबई- पुणे लेन वर लागू असणार आहे. पुण्याकडून मुंबईला जाणारी वाहतूक ही पूर्णपणे सुरळीत असणार आहे. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दरम्यान दुपारी 3 नंतर मुंबई-पुणे वाहतूक देखील प्रवासासाठी नियमित खुली केली जाणार आहे. या ब्लॉक दरम्यान कोणतीही अडचण आल्यास प्रवासी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाशी 9822498224 , महामार्ग पोलीस विभागाच्या 9833498334 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now