Mumbai: पावसाळ्यात झाडे पडणे, पाणी साचणे, अपघात, वाहतूक कोंडी, खड्डे इ. समस्यांसाठी मिळणार त्वरीत मदत; MMRDA ने स्थापन केला नियंत्रण कक्ष, जाणून घ्या संपर्क क्रमांक

यासह कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला हाताळण्यासाठी 19 आपत्कालीन प्रतिसाद पथके असतील, ज्यात एक अभियंता आणि प्रत्येकी 10 कामगार कार्य करतील.

Mumbai Rain (Photo Credit - Twitter)

Control Room For Monsoon Season: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) आगामी पावसाळ्यासाठी (Monsoon) नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. नियंत्रण कक्ष 1 जून 2024 ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत चोवीस तास कार्यरत असेल. पावसाळ्यातील एमएमआरडीए प्रकल्पांशी संबंधित समस्या, झाडे उन्मळून पडणे, पाणी साचणे, अपघात, वाहतूक कोंडी, खड्डे आणि इतर कोणत्याही कारणांमुळे होणारी गैरसोय कमी करणे हे नियंत्रण कक्षाचे उद्दिष्ट आहे. या नियंत्रण कक्षाचे आपत्कालीन संपर्क क्रमांक 022-26591241, 022-26594176, 8657402090 आणि 1800228801 असे आहेत.

पावसाळ्यात एमएमआरमधील विविध प्रकल्प स्थळांवर सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मेट्रो टीममध्ये 300 हून अधिक अभियंते आणि कामगार असतील. यासह कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला हाताळण्यासाठी 19 आपत्कालीन प्रतिसाद पथके असतील, ज्यात एक अभियंता आणि प्रत्येकी 10 कामगार कार्य करतील. याव्यतिरिक्त, 18 आपत्कालीन केंद्रे, देखभाल वाहने आणि 17 रुग्णवाहिका 24x7 स्टँडबायवर ठेवल्या जातील.

पावसाळ्यातील जोखीम कमी करण्यासाठी, पाण्याचा निचरा कार्यक्षम करण्यासाठी 131 पाणी उपसणारे पंप आहेत आणि वाहतूक प्रवाह राखण्यासाठी बॅरिकेड्स समायोजित केले जातील. यासह पावसाळ्यापूर्वी मातीचे ढिगारे काढले जात आहेत, नाले आणि दुभाजकांची दुरुस्ती केली जात आहे आणि विद्युत उपकरणांची चाचणी केली जात आहे. भारतातील सर्वात लांब सागरी सेतू- अटल सेतूच्या सुरक्षिततेसाठीही सर्वसमावेशक उपाययोजना केल्या आहेत. इंटरचेंज परिसरात पूर येऊ नये म्हणून पुरेशा क्षमतेच्या पंपांची व्यवस्था करण्यात आली आहे. अटल सेतूमध्ये रुग्णवाहिका, अग्निशमन वाहन आणि वाहन टो क्रेनची चोवीस तास उपलब्ध आहे. अटल सेतूसाठी टोल फ्री क्रमांक 1800 203 1818 असा आहे. (हेही वाचा: Southwest Monsoon 2024 Updates: केरळ मध्ये मान्सून आला; महाराष्ट्रात पहा कधी पर्यंत होऊ शकेल आगमन)

एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले की, ‘आम्ही पावसाळ्याची तयारी करत असताना, सुरक्षितता ही आमची सर्वोच्च प्राथमिकता राहिली आहे. एमएमआरडीए प्रकल्पांचे कामकाज सुरळीतपणे चालावे यासाठी विभाग प्रमुखांना सुरक्षा उपायांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आणि नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गरज भासल्यास इतर संस्थांना तातडीने मदत देण्यास आम्ही वचनबद्ध आहोत.’ त्यांनी पुढे सांगितले, पावसाळ्यात कोणतीही तक्रार असल्यास, एमएमआरडीए कंट्रोल रूमचे कर्मचारी विश्लेषण करतील आणि संबंधित अभियंता/अधिकाऱ्याकडे पाठवतील. तक्रार एमएमआरडीएशी संबंधित नसल्यास, ती बीएमसी, पीडब्ल्यूडी, एमएसआरडीसी, रेल्वे इत्यादी संबंधित एजन्सींना कळवली जाईल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif