मुंबई पोलिसांकडून बोरिवली परिसरात डान्स बार वर धाड; 61 जणांना अटक तर 4 बारबालांची सुटका
मुंबई पोलिसांनी शहरातील बोरिवली परिसरात असलेल्या एका बार वर धाड घालून 61 जणांना अटक केली असून 4 महिला डान्सरची सुटका केली आहे.
मुंबई पोलिसांनी शहरातील बोरिवली परिसरात असलेल्या एका बार वर धाड घालून 61 जणांना अटक केली असून 4 महिला डान्सरची सुटका केली आहे. शनिवार (14 सप्टेंबर) च्या रात्री अंदाजे 11.30 च्या सुमारास पोलिसांनी धाड घातली. Indian Express च्या वृत्तानुसार, या धाडीमध्ये अनेक आक्षेपार्ह गोष्टी समोर आल्या आहेत. पोलिसांनी धाड मारल्यानंतर 32 बार कर्मचारी आणि 29 ग्राहकांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच पोलिसांकडून 4 बार डान्सरची सुटका करण्यात आली आहे. कस्तुरबा मार्ग पोलिस स्टेशनचे सिनियर इन्सपेक्टर नामदेव शिंदे यांनी न्यूज एजंसीला दिलेल्या माहितीनुसार, एकूण 61 लोकांना बार मधून अटक करण्यात आली आहे.
रविवार, (15 सप्टेंबर) दिवशी सार्या आरोपींना कोर्टात दाखल करण्यात आले त्यानंतर जामीनावर त्यांची सुटकादेखील झाली. काही मीडिया रिपोर्टनुसार, जुलै 2019 मध्ये कस्तुरबा मार्ग पोलिस स्थानकातील चार पोलिसांचे निलंबन करण्यात आलं होतं. यामध्ये डान्स बारवर आवश्यक कारवाई करण्यामध्ये दिरंगाई केल्याचा आरोप करण्यात आला आहे. बोरीवली परिसरातील बारनी कोर्टाची गाईडलाईन्स आणि आवश्यक परवानगी टाळत अवैध पद्धतीने बार सुरू ठेवले होते.
मे 2019 मध्ये 15 जणांना दक्षिण मुंबईमधून अशाच प्रकारे घातलेल्या धाडीतून अटक करण्यात आले होते. काही महिन्यांपूर्वी डान्सबारवरील बंदी उठवण्यात आली होती. सरकारकडून आता डान्स बारच्या वेळेस आणि डांस परफॉर्मन्ससाठी वेळ वाढवण्यात आली आहे.