Mumbai Bank Bogus Labor Case: मुंबै बँक बोगस मजूर प्रकरणात प्रविण दरेकर यांना मुंबई पोलिसांकडून नोटीस, चौकशीला हजर राहण्याचे आदेश

प्रवीण दरेकर यांना मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) नोटीस पाठवली असून, या प्रकरणात चौकशीसाठी हजर होण्याचे आदेश या नोटशीद्वारे देण्यात आले आहे.

Pravin Darekar | (Photo Credit : Facebook)

मुंबै बँक मजूर प्रकरणात (Mumbai Bank Bogus Labor Case) दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांची डोकेदुखी अधिकच वाढली आहे. प्रवीण दरेकर यांना मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) नोटीस पाठवली असून, या प्रकरणात चौकशीसाठी हजर होण्याचे आदेश या नोटशीद्वारे देण्यात आले आहे. ही नोटीसही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. येत्या सोमवारी म्हणजे 4 एप्रिल रोजी प्रविण दरेकर यांना मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात हजर होण्याचे आदेश या नोटीशीत आहेत. आम आदमी पक्षाच्या वतीने धनंजय शिंदे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन प्रवीण दरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मजूर नसतानाही प्रवीण दरेकर यांनी मुंबै बँक संचालक पदाची निवडणूक लढवली. त्या माध्यमातून दरेकर यांनी मुंबै बँकेचे ठेविदार, प्रशासन आणि सरकार यांची 20 वर्षे फसवणूक केली असा आरोप दरेकर यांच्यावर आहे.

प्रवीण दरेकर यांना सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश आहेत. प्रविण दरेकर हे मजूर प्रवर्गातून संचालक म्हणून 1997 पासून मुंबै बँकेवर निवडून येत आहेत. दरेकर हे नागरी सरकार बँक आणि मजू अशा दोन्ही प्रवर्गातून निवडून आले होते. त्याची मुंबै बँकेवर संचालक म्हणूनही बिनविरोध निवड झाली होती. दरम्यान, प्रवीण दरेकर यांना सहकार विभागाने मजूर यांना अपात्र ठरवले. (हेही वाचा, Pravin Darekar: मुंबै बँक प्रकरणी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल)

प्रवीण दरेकर यांनी आपल्यावर होणारी कारवाई टाळण्यासाठी न्यायालयात दाद मागितली. प्रविण दरेकर यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने दोन आठवड्यांचा दिलासा दिलासा दिला आहे. दरेकर यांनी अटकपूर्व जामिनासाठीही अर्ज केला आहे. या जामीन अर्जावर 29 मार्च रोजी हायकोर्टात वेळेअभावी सुनावणी पार पडू शकली नाही. त्यामुळे दरेकर यांचे वकील अखिलेश चौबे यांनी न्यायालयाकडे मागणी केली की, पुढील सुनावणीपर्यंत अटकेपासून दिलासा कायम ठेवण्याची मागणी केली आहे.