मुंबई: आधुनिक तंत्रज्ञानासह पुन्हा एकदा नव्याने सक्रिय होणार पोलिसांचे अश्वदल
त्याशिवाय जमावावर नियंत्रण करण्यासाठीही याचा वापर केला जाणार आहे
मुंबईतील खूप जुने असं पोलिसांचे अश्वदल तब्बल 88 वर्षांनी पुन्हा एकदा सुरु होणार आहे. इतकंच नव्हे तर पुन्हा एकदा नव्याने सुरु होणारे हे अश्वदल आधुनिक तंत्रज्ञानाने आपल्या समोर येणार आहे. मुंबई पोलिसांकडे असणाऱ्या अनेक दलांमध्ये आता पुन्हा एकदा एका दलाची भर पडणार असल्याने पोलिसांमध्येही प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. 26 जानेवारीला म्हणजेच प्रजाकसत्ताक दिनापासून हे युनिट सुरु होणार आहे. मुंबई पोलिसांच्या या युनिटमध्ये ३० घोडे असणार आहेत.
बृन्मुंबईच्या या माउंटेड पोलीस युनिटमध्ये 1 सब इन्सपेक्टर, 1 एएसआय, 4 हेडकॉन्स्टेबल, 32 कॉन्स्टेबल असणार आहेत. त्याशिवाय जमावावर नियंत्रण करण्यासाठीही याचा वापर केला जाणार आहे. हेदेखील वाचा- मुंबई पोलीस आता घोड्यावरून घालणार गस्त; नवीन मांउटेंड कॅाप्स पथकाची स्थापना
अश्वदलात अत्याधुनिक यंत्रणा:
अश्वदलात असणाऱ्या पोलिसांना / घोडेस्वारांना वॉकीटॉकी देण्यात येणार आहे. यांपैकी समुद्र किनारी दोन घोडे असतील. या घोडेस्वारांना बॉडी कॅमेरा दिला जाणार आहे. शिवाय मरोळमध्ये पागा तयार केल्या जाणार आहेत. सध्या दादरच्या शिवाजी पार्क येथे याची तात्पुरती सोय करण्यात आली आहे.
शिवाजी पार्क येथे 26 जानेवारीच्या परेडमध्ये या दलातील 11 घोडे असतील. 4-5 लाखांना या घोड्यांची खरेदी करण्यात आली आहे. आर. टी. निर्मल हे या दलाचे प्रशिक्षणाचे प्रमुख आहेत. आतापर्यंत यासाठी सरकारने 13 घोडे खरेदी केले आहेत, तर 17 घोड्यांची खरेदी येत्या काळात केली जाणार आहे.