INS Vikrant: किरीट सोमय्या आणि मुलगा नील यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा, 'बाप बेटे तरुंगात जाणार' संजय राऊत यांचा पुनरुच्चार
किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या (Neel Somaiya) यांच्या विरोधात माजी सैनिकांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीवरुन या पितापुत्रांवर मुंबई पोलिसांनी ट्रॉम्बे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
युद्धनौका आयएनएस विक्रांत (INS Vikrant) प्रकरणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या अडचणीत आले आहेत. किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या (Neel Somaiya) यांच्या विरोधात माजी सैनिकांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीवरुन या पितापुत्रांवर मुंबई पोलिसांनी ट्रॉम्बे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बबन भोसले असे तक्रार दाखल करणाऱ्या माजी सैनिकाचे नाव आहे. दरम्यान, बाब बेटे तुरुंगात जाणार असा पुनरुच्चार करत शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हल्लाबोल केला आहे. त्यामुळे सोमय्या यांच्यावर आता कोणती कारवाई होणार याबाबत उत्सुकता आहे.
मुंबई पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 420, 406, 34 अन्वये किरीट आणि नील सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार माजी सैनिक बबन भोसले, संजय राऊत यांचे बंधू सुनिल राऊत आणि इतर काही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी अप्पर पोलीस आयुक्त संजय दराडे यांची काल (बुधवार, 6 एप्रिल) सायंकाळी भेट घेतली. या वेळी भोसले यांनी तक्रार दाखल केली. माजी सैनिक बबन भोसले यांनी दिलेल्या तक्रारीत सोमय्या पितापुत्रांनी INS विक्रांत ही युद्धनौका वाचविण्यासाठी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर पैशांच्या रुपात निधी गोळा केला. या निधीचा त्यांनी अपहार केला असा आरोप आहे. (हेही वाचा, Sanjay Raut: किरीट सोमय्या यांची वकीली करणारे देवेंद्र फडणवीस नकली हिंदुत्वाचे पुरस्कर्ते संजय राऊत)
ट्विट
शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही असाच आरोप केला आहे. त्यामुळे आगामी काळात किरीट सोमय्या यांच्या अडचणी वाढणार का याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी पुन्हा एकदा जाहीरपणे पुनरुच्चार करत ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे की, 'INS विक्रांत चया नावे 56 कोटी गोळा करून जनतेला देशाला फसवणाऱ्या सोमय्या बाप बेटायाना जेल मध्ये जावेच लागेल. किरीट सोमय्या हा महाराष्ट्र द्रोही तर होताच पण देशद्रोही असल्याचे उघड झाले आहे. लोकांनी आता गप्प बसू नये. जवानांचे शोषण करणाऱ्या BJPला जाब विचाराच लागेल'.