Mumbai Police Best Tweets: ट्विटरवर 5 वर्षे झाल्याच्या निमित्ताने मुंबई पोलिसांनी शेअर केले आपले सर्वोत्कृष्ट ट्विट्स, Watch Video
या व्हिडिओसोबत जर तुम्हालाही मुंबई पोलिसांचे कोणते ट्विट्स आवडले असतील तर तुम्ही देखील #MyFavMPTweet वापरून तुमचे आवडते ट्विट्स 'शेयर' करा अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
सध्या सर्वत्र थर्टी फर्स्टचा (31st December) उत्साह दिसून येत आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबई पोलिस (Mumbai Police) रात्रंदिवस पहारा देत आहेत. त्यामुळे सोशल मिडियाच्या माध्यमातून ते नागरिकांना देखील वेळोवेळी सतर्क करत असतात. त्यासाठी त्याने ट्विटरचा (Twitter) आधार घेऊन लोकांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. या ट्विटरवर अकाउंट उघडून 5 वर्षे पूर्ण झाल्याने मुंबई पोलिसांनी आपले आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट ट्विट्सची माहिती देणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे. आपले आतापर्यंतचे काही आवडते ट्विट्स मुंबई पोलिसांनी ट्विटर अकाउंटवर शेअर केले आहेत.
या व्हिडिओसोबत जर तुम्हालाही मुंबई पोलिसांचे कोणते ट्विट्स आवडले असतील तर तुम्ही देखील #MyFavMPTweet वापरून तुमचे आवडते ट्विट्स 'शेयर' करा अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.हेदेखील वाचा- Lockdown in Maharashtra: राज्यातील लॉकडाऊन मध्ये 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढ
यात गुन्हेगारी रोखण्यासाठी तात्काळ 100 नंबरवर कॉल करुन पोलिसांनी माहिती द्या या ट्विटपासून जेव्हा एखादा मोटारसायकलस्वार हेल्मेट घालण्यास मनाई करतो तेव्हा #Sillyboy असे ट्विट देखील खूप लोकप्रिय झाले होते.
या व्हिडिओखाली 5 वर्षांपूर्वी आपली भेट ट्विटरवर झाली होती. या 5 वर्षांत आम्ही तुमच्या अधिक जवळ येऊ शकलो असे कॅप्शनही मुंबई पोलिसांनी दिले आहे.
मुंबई पोलिसांनी कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनच्या काळात अनेक सामाजिक संदेश दिले. तसेच मजेशीर मिम्सचा माध्यमातून देखील जनजागृती केली. त्यामुळे मुंबई पोलिसांनी सोशल मिडियाचा योग्य पद्धतीने वापर करुन लोकांना वेळोवेळी सतर्क केले.