मुंबई: अंधेरी मध्ये पोलिसांची पब, बार वर धडक कारवाई; कोविड 19 लॉकडाऊन नियम उल्लंघनाचा ठपका ठेवत 196 जणांना अटक

मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) आज रविवार (1 नोव्हेंबर) अंधेरी (Andheri) भागात बार आणि पब मध्ये कोविड 19 लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन करणार्‍या 196 जणांवर कारवाईचा बडगा उचलला आहे

Police| (Photo Credits: Twitter)

मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) आज रविवार (1 नोव्हेंबर) अंधेरी (Andheri) भागात बार आणि पब मध्ये कोविड 19 लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन करणार्‍या 196 जणांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या लोकांनी लॉकडाऊन नियमांचे (COVID 19 Lockdown Guidelines)  पालन केले नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांना मिळालेया माहितीनंतर सोशल सर्विस शाखेने अंधेरीच्या साकीनाका परिसरात असलेल्या बार आणि पब वर धाड टाकली आणि कारवाई केली. मुंबईत Mask न घालणाऱ्या 9 हजार जणांच्या विरोधात BMC ची कारवाई, 18 लाखांचा दंड वसूल

मुंबई पोलिसांच्या साकिनाका येथील धडक कारवाईमध्ये 196 जण ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यामध्ये 171 पुरूष आणि महिला ग्राहकांचा समावेश आहे. तर 19 कर्मचार्‍यांचा समावेश आहे. यांच्यासोबतच 2 मालक, 3 मॅनेजर आणि कॅशियरला देखील पोलिसांनी अटक केली आहे. Mumbai Police: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी केलेल्या कामाचे उच्च न्यायालयाकडून तोंडभरुन कौतुक.

मुंबई पोलिसांनी FIR दाखल करत भारतीय संविधा कलम 188, 285 अंतर्गत कारवाई केली आहे. त्यामध्ये सरकारी आदेशांचं उल्लंघन, आग व ज्वलनशील पदार्थांकडे दुर्लक्ष अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. दरम्यान नोव्हेंबर महिन्यातही राज्यात सर्वत्र अनलॉक 5 ची नियमावली लागू आहे. कंटेन्मेंट भागात कडक लॉकडाऊन राहणार आहे. राज्यात रेस्टॉरंट आणि बार हे 50% क्षमतेसह खुले केले आहेत.

मुंबई मध्ये शनिवार (31 ऑक्टोबर) दिवशी 993 नवे रूग्ण समोर आले आहेत. शहरात 2,57,500 एकूण रूग्णसंख्या आहे. तर शहरात 10,250 एकूण मृत्यू झाले आहेत.