Mumbai Police On Anand Mahindra: आनंद महिंद्रा यांच्या आठवणींची चोरी, मुंबई पोलिसांकडून तत्काळ प्रतिसाद
उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी मुंबईतील डबल डेकर बस सोबत असलेल्या आठवणींची चोरी झाल्याची तक्रार करता मुंबई पोलिसांनी मजेशीर प्रतिसाद दिला आहे.
Memories Of Mumbai Double Decker Bus: मुंबईकर आणि डबल-डेकर बस यांचे खूप जुने नाते. जळपास पाठीमागील आठ दशकांचे. हे नाते या आठवड्यापासून समाप्त होऊन केवळ स्मृतींच्या रुपात राहणार आहे. हाच धाका पकडत उद्योगपती आनंद महिंद्रा ( Anand Mahindra) यांनी मुंबई पोलिसांकडे एक हटके तक्रार केली आहे. अर्थात, मुंबई पोलीस (Mumbai Police) हे सुद्धा काही कमी नाहीत. त्यांनी उद्योगपतींच्या गोड तक्रारीला तितकाच मजेशीर प्रतिसाद दिला आहे. ट्विटरवर रंगलेला हा संवाद आपण येथे पाहू शकता.
मुंबई पोलिसांचे 'एक्स' (पुर्वीचे ट्विटर) अकाऊंट @MumbaiPolice ला टॅग करत आनंद महिंद्रा यांनी म्हटले आहे की, हॅलो मुंबई पोलीस.. माझ्या बालपणीच्या आठवणींची चोरी झाली आहे. मला तक्रार द्यायची आहे. उद्योगपतींनी तक्रारीसंदर्भात चौकशी करण्यासाठी केलेल्या एक्समध्ये डबल डेकर बसला अलविदा करण्याबाबतच्या एका वेबसाईटने देलेले वृत्त रिट्विट करण्यात आले आहे. या तक्रारीला मग मुंबई पोलिसांनीही मजेरीश प्रतिसाद दिला आहे. मुंबई पोलिसांच्या इंग्रजी एक्सचा मराठीत भावार्थ असा की, 'येस सर, चोरी झाले आहे हे दिसत आहे. आम्हाला @anandmahindra सर यांच्याकडून एक 'nostalgic heist' report प्राप्त झाला आहे. स्पष्टपणेच दिसते आह की, चोरी झाली आहे. पण, पण आपण ती ताब्यात घेऊ शकत नाही. B.E.S.T सोबत असलेल्या आपल्या लाडक्या आठवणी आपल्याप्रमाणेच तमाम मुंबईकरांच्या हृदयात सुरक्षीतपणे जपून ठेवल्या आहेत.
ट्विट
डबल डेकर बस कायमच्या बंद
बृहन्मुंबई इलेक्ट्रिसिटी सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) उपक्रमाच्या अधिकाऱ्याने निर्णयाची पुष्टी करत 12 सप्टेंबर रोजी म्हटले की, आठ दशकांहून अधिक काळ शहराच्या सार्वजनिक वाहतुकीचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या मुंबईच्या प्रतिष्ठित लाल डबल-डेकर बसेस या आठवड्यात बंद होतील.या बसेस ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात शहरातील रस्त्यावरून हटवल्या जातील. या बसेस 15 सप्टेंबरपासून कायमस्वरूपी रस्त्यावरून बंद होतील, तर खुल्या डेक बसेस 5 ऑक्टोबर रोजी बाहेर काढल्या जातील. दरम्यान, या बससोबत तमाम मुंबईकरांच्या आठवणी जोडलेल्या आहेत. सहाजिकच या बसेसचा निर्णय ऐकून अनेकांना वाईट वाटले असणार.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)