पारसी धर्मियांना मोठा दिलासा, मेट्रो स्टेशन अग्नि मंदिरापासून दूर उभारणार
त्यामुळे पारसी धर्मियांना मोठा दिलासा मिळाला आहे.
रेल्वे प्रशासनाने सोमवारी सुप्रीम कोर्टाला पारसी धर्मियांच्या अग्नि मंदिरापासून 20 किमी दूर अंतरावर काळबादेवी मेट्रो स्टेशन 3 उभारण्यात यावे असे सांगितले आहे. त्यामुळे पारसी धर्मियांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मेट्रो उभारणीसाठी या मंदिराला धोका संभवत असल्याने पारसी धर्मियांनी त्यासाठी विरोध केला होता. पारसी धर्मियांकडून याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामध्ये मेट्रो 3 च्या टनलसाठी केल्या जाणाऱ्या खोदकामाला विरोध केला होता. तसेच मुंबई मेट्रो आझाद मैदानाजवळ 2 टनल बनवणार आहे. जे कुलाबा-वांद्रे सीप्ज मेट्रो या पद्धतीने जोडणार आहे. तर दुसरा टनल 2 अग्नि मंदिर आणि आताश बेहराम जवळून जाणार आहे. त्यामुळे एक टनल प्रिंन्स स्ट्रिट येथे असून दुसरा काळबादेवी येथे आहे. परंतु या दोन्ही ऐतिहासिक गोष्टी आहेत.
कोर्टाने बीएमसीच्या तांत्रिक सल्लागारांना दक्षिण मुंबईतील ऐस्प्लेन्डे इमारतीचे निरिक्षण करण्यास सांगितले असून त्याबाबक एक रिपोर्ट तयार करा असा आदेश दिला आहे. त्यामुळे खरच या भागांची दुरुस्ती करणे जरुरीचे आहे? ही इमारत ऐतिहासिक वास्तू आहे.