ओला, उबर टॅक्सी चालक पुन्हा संपावर; मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरातील प्रवाशांची वीकेडंला अडचण
रविवारी मध्यरात्रीपासून ओला, उबर टॅक्सीचालक संपावर गेले आहेत.
Mumbai Ola-Uber strike update: दिवाळीपूर्वी दिलेल्या आश्वासने पूर्ण झाली नसल्याने ओला, उबर टॅक्सीचालकांनी पुन्हा एकदा संपाचे हत्यार उपसले आहे. रविवारी मध्यरात्रीपासून ओला, उबर टॅक्सीचालक संपावर गेले आहेत. मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे शहरातील ओला, उबर टॅक्सी चालक, मालक संपावर आहेत. साप्ताहित सुट्टीच्या दिवशीच हा संप सुरु झाल्याने आठवड्याची सुट्टी साजरी करण्यासाठी शहरात किंवा शहराबाहेर जाणाऱ्या मंडळींची चांगलीच अडचण झाली आहे.
दरम्यान, ओला, उबर चालक संघटना उद्या विधान भवनावर मोर्चा काढणार आहेत. या मोर्चात केवळ चालक, मालकच नव्हे तर, त्यांचे कुटुंबीयही सहभागी होणार आहे. या चालक, मालकांनी दिवाळीपूर्वीही संप पुकारला होता. हा संप सुमारे 12 दिवस सुरु होता. मात्र, त्यांच्या प्रश्नावर 15 नोव्हेंबरपर्यं तोडगा काढू असे अश्वासन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिला होता. मात्र, हे अश्वासन अद्याप पाळले गेले नाही, असा संपकऱ्यांचा आरोप आहे. (हेही वाचा, पुण्यातील ओला चालकाला मुंबईत मारहाण, कपडे काढून उठाबशांची शिक्षा)
ओला, उबर टॅक्सी चालक, मालकांच्या एकूण 13 मागण्या आहेत. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी त्यांनी संपाचे हत्या उपसले आहे.