Mumbai News: मालवणी बस डेपोत इलेक्ट्रॉनिक बसला आग, घटना कॅमेरात कैद
ही घटना कॅमेरा कैद करण्यात आली आहे.
Mumbai News: मालवणी बस डेपोत उभ्या असताना बेस्ट इलेक्ट्रानिक बसला शुक्रवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. घटनास्थळी प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, बसमधून दाट धूर निघत होता, आगीची तीव्रता वाढल्याने डेपो कर्मचारी आणि आसपासच्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. अग्निशमन दलाच्या पथकाने त्वरीत आग विझवली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. आग कशाने लागली याचे मुख्य कारण अद्याप स्षट झाले नाही.
सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, बस नोंदणी क्रमांक MH-01-DR-2260 ने ओळखली गेली, ती TATA Motors Ltd सोबत भाडेतत्त्वावरील कराराखाली होती. बेस्टच्या भाडेतत्त्वावरील बसेसला आग लागल्याची ही पहिलीच घटना नाही. याआधी फेब्रुवारी 2023 मध्ये, आगीच्या घटनांच्या मालिकेने बेस्ट उपक्रमाला 400 टाटा सीएनजी बसेस रस्त्यावर उतरवण्यास प्रवृत्त केले. या बसेस नंतर सखोल तपासणीनंतर आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र मिळाल्यानंतर पुन्हा सेवेत दाखल करण्यात आल्या.
नुकत्याच लागलेल्या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक तपासात ही आग यांत्रिक बिघाडामुळे किंवा बसमधील विजेच्या समस्येमुळे लागली असावी, असे समजते. घटनेचे मूळ कारण शोधण्यासाठी सर्वसमावेशक तपासणी केली जाईल." एका अधिकाऱ्याने सांगितले. या घटनेत कोणतीही जीवीतहाणी झाली नाही.