Dahisar Fire News: दहिसर परिसरात औद्योगिक वसाहतीला भीषण आग, कोणीतीही जीवित्तहानी नाही

मुंबईतील दहिसर भागातील ग्राउंड-प्लस-एक मजली औद्योगिक वसाहतीमध्ये भीषण आग लागली,

dahisar Fire News

Dahisar Fire News: मुंबईतील दहिसर भागातील ग्राउंड-प्लस-एक मजली औद्योगिक वसाहतीमध्ये भीषण आग लागली, या घटनेत कोणतीही जीवित्तहानी झाली नाही असे अग्निशमन विभागाच्या अहवालात म्हटले आहे. शनिवारी 11 च्या सुमारास ही घटना घडली. अग्निशमन दालाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सात तासानंतर आग नियत्रंणात आली. आग लागल्यावर सात अग्निशमन गाड्या, सहा जंबो टँकर, एक पाण्याचा टँकर, रुग्णवाहिका आणि इतर मदत घटनास्थळी दाखल झाली, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.