Mumbai News: बीएमसीमध्ये नोकरीचे आमिष दाखवून दोघांकडून 12 लाखांची फसवणूक, मालाड येथील घटना
मालाड पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Mumbai News: नोकरीचे आमिष दाखवून आता पर्यंत किती तरी तरुणांना लाखो रुपयांचा चूना लावला आहे. दरम्यान मुंबईत एका व्यक्तीने मालाड येथील दोन तरूणांना बीएमसीमध्ये नोकरीचे आमिष दाखवून १२ लाख रुपयांची फसवणू केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मालाड पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण २०२१ पासून चालू असल्याची माहिती पीडितेने दिली. सतीश चिंकटे असं पीडित तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा पीडितेच्या शेजारच्या ओळखीचा होता. शेजारच्या मुलाला बीएमसीमध्ये नोकरी लावतो अशी आश्वासाने दिली.अतुल राठोड असे आरोपीचे नाव आहे. बीएमसीमध्ये मोठी ओळख आहे तिथे तरुणांना नोकरीला लावून देतो अशी खोटी आश्वासने देत दो कुटुंबाकडून पैसे लुटले. आरोपीने दावा केला की एकाला मी बीएमसीमध्ये नोकरी लावून दिली.त्याचे खोटे नियुक्ती पत्र सादर केले होते.त्यामुळे पीडित आणि त्याच्या कुटुंबियाचा त्याच्यावर विश्वास बसू लागला. दरम्यान पीडितेच्या शेजारच्या मित्राने बीएसमीत नोकरी मिळवण्याची इच्छा व्यक्त केली.
त्यानंतर काही दिवसांनी पीडितेने देखील नोकरीची इच्छा व्यक्त केली. आरोपींनी दोन्ही पीडितांना लवकरच नियुक्ती पत्र दिले जाईल अशी माहिती दिली. आणि त्यांना पैसे देण्यास सांगितले. नंतर त्याने एका पीडितेच्या आईला पैसे देण्यासाठी बँकेचे कर्ज घेण्यास भाग पाडले. जेव्हा पीडितेच्या आईला बँकेचे कर्ज मिळू शकले नाही तेव्हा आरोपीने त्याला पैसे देण्यासाठी क्रेडिट कार्ड मिळावे असा आग्रह धरला. २.५ लाख रुपये देण्यासाठी त्याने आईचे सोने गहाण ठेवले होते. काही दिवसांनंतर पैशांची फसवणूक झाली असे समजल्यावर दोघांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार नोंदवला गेला.