Mumbai News: चेंबूर येथे लाच घेताना रंगेहात पकडलं, तीन पोलिसांवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चेंबुर येथील एका सावकराकडून लाच घेतल्याप्रकरणी तीन पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
Mumbai News: महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चेंबुर (Chembur) येथील एका सावकराकडून लाच घेतल्याप्रकरणी तीन पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. या तिन्ही पोलिस अधिकाऱ्यांविरुध्द चेंबुर परिसरातील आरसीएफ पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवला गेला आहे. मुरलीदार कर्पे असं सहाय्यक पोलिस आयुक्ताचे नाव आहे.महिन्याभरापुर्वी त्यांना बढती मिळाली होती. यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक राहुल जाधव आणि पोलिस हवालदाक गणेश मोझर हे दोन पोलिस अधिकारी आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सावकराने दोन पेक्षा जास्त लोकांना १७ लाख रुपये दिले होते ते परत करण्यात यश मिळत नव्हते. त्यामुळे त्यांच्याविरोधात तक्रार नोंदवायची होती. पोलिस ठाण्यात तक्रारीसाठी गेल्यावर पोलिसांनी त्यांकडून लाच घेतली आणि तीही स्वीकारली. नंतर या तिघांनी तक्रारदाराकडून एफआयआर नोंदवण्यासाठी आणखी लाच मागितली अशी माहिती समोर आली आहे.
त्यांच्या मागणीनुसार, त्यांनी तक्रारदाराला करपे यांना १० ग्रॅम सोन्याची नाणी, जाधव यांना ६० हजार रुपये आणि मोझर यांना ५ हजार रुपये देण्यास सांगितले. तक्रारदाराने ८ डिसेंबर रोजी एसीबीकडे तक्रार केली आणि यासंदर्भात गुन्हा नोंदवला. त्यानंतर तिन्ही पोलिस अधिकाऱ्यांना १४ डिसेंबर रोडी लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. तिघांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबी या प्रकरणाची अधिक चौकशी करत असल्याचे त्यांनी सांगितले.