Mumbai Air Pollution: मुंबईत फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी करण्याचे पालकमंत्री केसरकरांचे आवाहन

अनेक ठिकाणी जिथे बांधकाम सुरू आहे तिथे नियमांचा उल्लंघन करण्यावर कारवाईची नोटीस दिली जात असल्याचे दीपक केसरकर यांनी म्हटले.

Deepak Kesarkar | (Photo Credit - Twitter)

सध्या मुंबईच्या हवेची स्थिती (Mumbai Air Pollution) ही खराब या श्रेणीत असून याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होतांना दिसत आहे. यासाठी राज्य सरकारने मुंबईकरांना फटाकेमुक्त दिवाळी (Firecracker Free Diwali) साजरी करण्याचे आवाहन केले आहे. फटाके न वाजविण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केला आहे. मुंबईत सुद्धा फटाके न वाजवत दिवाळी साजरी करावी असे आवाहन पालकमंत्री म्हणून करत असल्याचे मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी म्हटले.  (हेही वाचा - Maharashtra Cabinet Meeting Decisions: धनगर समाजासाठी शक्तीप्रदत्त समिती, आश्रमशाळेतील शिक्षकांच्या 282 पदांची भरती, एअर इंडिया इमारत खरेदी; महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतले अनेक महत्वाचे निर्णय)

मुंबईत हवा प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध भागात पाणी मारण्याचे काम ठिकठिकाणी सुरू आहे. अनेक ठिकाणी जिथे बांधकाम सुरू आहे तिथे नियमांचा उल्लंघन करण्यावर कारवाईची नोटीस दिली जात असल्याचे दीपक केसरकर यांनी म्हटले. नोटीस मिळाल्या किंवा नाही जिथे बांधकाम सुरू आहे तिथे त्यांच्यामुळे प्रदूषण होणार नाही याची जबाबदारी त्यांनी स्वतः घ्यावी असा इशाराही त्यांनी दिला. मुंबई शहरात रस्त्यांची कामे सुरू झाली असल्याची माहिती पालक मंत्र्यांनी दिली. 25 यंत्रणांची परवानगी घेऊन ही कामे करावी लागतात. ज्यांनी कामे सुरू केली नाही त्यांच्यावर कारवाई होईल असेही त्यांनी म्हटले.

दिवाळीत पदपथावर फराळ विक्री केली जाते. त्यासाठी स्टॉल टाकले जातात. त्यांच्यासाठी पाडव्यापर्यंत त्यांना स्टॉल लावून फराळ-पदार्थ विक्री करता येईल. त्यांना आम्ही परवानगी दिली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. पाडाव्या नंतर या फराळ विक्रेत्यांनी आपले स्टॉल रस्त्यावरुन काढून टाकावे, अशी सूचना ही दीपक केसरकर यांनी केली.