BMC Budget 2019: मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आज होणार सादर; 'या' आहेत अर्थसंकल्पातील खास तरतूदी

देशात लोकसभा आणि महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीचे नगारे वाजत असताना आज मुंबई पालिकेचा 2019-2020 या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प सादर होणार आहे.

मुंबई महानगरपालिका (Photo Credits: Facebook)

BMC Budget 2019: देशात लोकसभा आणि महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीचे नगारे वाजत असताना आज मुंबई पालिकेचा 2019-2020 या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. पालिका आयुक्त अजोय मेहता (Ajoy Mehta)  स्थायी समितीच्या बैठकीत अर्थसंकल्प सादर करतील. यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडेल. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा नवा अर्थसंकल्प 30,000 कोटींचा आकडा पार करु शकतो. मुंबई महानगरपालिकेच्या नव्या अर्थसंकल्पात काय खास असणार जाणून घेऊया...

# सागरी किनारा मार्ग, पश्चिम आणि पूर्व उपनगरे जोडण्यासाठी गोरेगाव-मुलूंड लिंक रोड, पादचारी पूल, उड्डाणपूल यांच्या दुरुस्तींसाठी अर्थसंकल्पात भरीव तरदूत करण्यात येईल. करदात्यांसाठी खूषखबर, 5 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त, 2019-2020 आर्थिक वर्षात पहा कोणाला, कसा भरावा लागणार Income Tax

# जुन्या, वाईट अवस्थेतील जलवाहिन्या बदलणे, जलवितरण व्यवस्था सुधारणे, घनकचरा व्यवस्थापन, डॅम्पिंग ग्राऊंड योग्य पद्धतीने बंद करणे इत्यादी कामांची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात येणार आहे.

# त्याचबरोबर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी निधीची तरतूद या अर्थसंकल्पात करण्याची शक्यता आहे.

# बेघरांसाठी घर बांधण्यास प्राधान्य देण्यात येणार असून अतिक्रमणमुक्त झालेल्या जमिनींवर नवी उद्याने, दवाखाने, मिनी फायर स्टेशन आणि शाळांचे बांधकाम करण्यात येणार आहे.

# या अर्थसंकल्पात कचऱ्यावरही कर आकारण्यात येऊ शकतो.

# तसंच मोठे प्रकल्प आणि नागरी सुविधा निधीची कमी भासू नये म्हणून विविध परवान्यांच्या शुल्कात वाढ करण्यात येईल.

विशेष म्हणजे आगामी आर्थिक वर्षात मुंबईकरांवर कोणतीही नवी करवाढ लादण्यात येणार नाही. 2018-2019 या आर्थिक वर्षातील तरतुदींवर 36.74% रक्कम विकास कामांवर खर्च झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.